head master.jpg 
नाशिक

येवल्यातील सात शाळांना मिळाले नवे मुख्याध्यापक!

संतोष विंचू

नाशिक : (येवला) जिल्हा मुख्याध्यापक संघ सतत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तरांचे प्रश्न सोडवत असतो. सध्या शाळांचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. कोविडच्या संकटात सुद्धा आम्ही शिक्षकांचे पगारासह सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षकांच्या पेंन्शनचा लाभ देणे, शालार्थ, संच मान्यता दुरुस्ती, वरिष्ट व निवड श्रेणीचे प्रस्ताव मार्गी लावणे, मेडीकल व फरकाची बीले मंजूर करणे या समस्या सातत्याने सोडवत असून हा शिक्षक सेवेचे हे कार्य अव्याहतपणे सुरू राहील, असे प्रतिपादन मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष एस.के.सावंत यांनी केले.

सेवानिवृतांचा सत्कार तर नवनियुक्तांचे स्वागत

तालुका मुख्याध्यापक संघातर्फे येथे सेवानिवृत मुख्याध्यापकांचा सत्कार तसेच नवनिर्वाचित मुख्याध्यापकांचे स्वागताचा कार्यक्रम पार पडला, यावेळी ते बोलत होते. गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी.देशमुख, उपाध्यक्ष माणिक मढवई, नांदगांव तालूका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक कदम, टी.एम.डोंगरे, रावसाहेब मवाळ,शिवाजी वाघ, आर.एल.चिने, बी.व्ही.पांडे, सी.बी. कुळधर आदींची प्रमुख उपस्थिती होती. अखेरच्या श्वासापर्यंत मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत राहणार असून आपल्या समस्या तालुका प्रतिनिधी मार्फत संघाकडे पाठवा. निश्चितच आम्ही पाठपुरावा करून न्याय मिळवून देवू असे एस.बी. देशमुख यांनी काढले. 

उपाध्यक्ष माणीक मढवई यांनी मुख्याध्यापक संघाचे कौतुक करताना मुख्याध्यापक संघाची भरारी गरुडासारखी असल्याचे म्हटले. यावेळी येवला तालूक्यातून गोरख कुळधर यांची जिल्हा मुख्याध्यापक संघावर एकमताने निवड करण्यात आली. प्रास्ताविक तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पंडीत मढवई यांनी केले, तर सुत्रसंचलन राजेंद्र चव्हाण यांनी केले. सेवानिवृत्तीनिमित्त दत्तात्रय नागडेकर, रामदास भड, एस.आर.दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील शाळांवर मुख्याध्यापकपदी नियुक्त झालेले  मुख्याध्यापक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT