wedding 1.jpg 
नाशिक

"लग्नाचे नंतर बघू..आधी लढा कोरोनाशी!" 'या' तलाठ्यांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / विंचूर : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. परंतु त्याहीपेक्षा कर्तव्यसुद्धा महत्त्वाचे असते, असा संदेश विंचूर-लासलगाव येथे कर्तव्यावर असलेल्या तलाठी सागर शिर्के यांनी आपले लग्न पुढे ढकलत दिला आहे. आधी कोरोनाविरुद्धचा लढा आणि नंतर लग्न, असं म्हणत त्यांनी आयुष्यातला मोठा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे तलाठी शिर्के यांच्या या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे. 

लग्नापेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व 
विंचूर सजा येथे नियुक्तीला असलेले कामगार तलाठी सागर शिर्के यांचे लग्न नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील ज्ञानेश्‍वर जाधव यांची कन्या रेणुका हिच्याशी रविवारी (ता.26) होणार होता. लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. परंतु या कालावधीत कोरोनामुळे त्यांची ड्यूटी विंचुर, लासलगावला लागली. लासलगावला जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने तसेच याठिकाणी विलगीकरणाची सोय केल्याने डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्याबरोबरीनेच त्यांना सलग ड्यूटी करावी लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लग्न पुढे ढकलत लग्नापेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व देत ते ड्यूटी करत आहे. तसेच लॉकडाउनदरम्यान येथील ज्या कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही, अशा गरीब व गरजू कुटुंबांना तलाठी शिर्के यांनी स्वत: तसेच गावातील सामाजिक, राजकीय व्यक्तींकडून जीवनावश्‍यक वस्तू जमा करून गरीब कुटुंबीयांना वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 

आधी लढा कोरोनाशी, मग लग्न 
वैयक्तिक आनंदापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे आहे. आधी लढा कोरोनाशी, लग्न नंतरही होईल. सगळ्यांनी घरीच बसा. सहकार्य करा. 
सगळे मिळून कोरोनाला हरवू या आणि कोरोनापासून देशाला वाचवू या. - सागर शिर्के, तलाठी, विंचूर सजा 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त

स्वत:चे लग्न पुढे ढकलत कर्तव्य बजावत असलेले येथील कर्तव्यदक्ष तलाठी शिर्के हे डॉक्‍टर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्यासोबत बरोबरीने अहोरात्र काम करताना दिसत आहेत. सलाम त्यांच्या कार्याला. - रंजित गुंजाळ, राष्ट्रवादी नेते, विंचूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल

SCROLL FOR NEXT