A team of Pawarwadi police including Salim Musa Qureshi who was arrested on suspicion of mandul smuggling. esakal
नाशिक

Nashik Crime News : मांडूळ बाळगणाऱ्याला अटक; वनविभागाच्या कारवाईत 2 मांडुळ जप्त

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात अवैधरित्या मांडुळ सापाची तस्करी करण्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. येथे सातत्याने मांडूळ प्रजातीचे साप पकडून त्याची विक्री करण्याचे प्रकार वारंवार घडतात. येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीवरुन शिताफीने सापळा रचून शहरातील पवारवाडी भागातील लब्बैक हॉटेलजवळ मांडुल बाळगणाऱ्याला अटक केली. सलीम मुसा कुरेशी असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून लाखो रुपये किंमतीचे दोन मांडूळ साप जप्त करण्यात आले. (Arrest of Mandul Possessor 2 mandul seized in action of forest department Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

शहर व परिसरात मांडुळांची चोरटी तस्करी होत असल्याची माहिती उपविभागीय वन अधिकारी जगदीश येडलावार यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे, वन परिमंडळ अधिकारी अतुल देवरे व सहकाऱ्यांनी सापळा रचला. संशयित सलीम येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या जवळील प्लॅस्टिक गोणीत दोन मांडूळ साप आढळले. पथकाने मांडूळ जप्त केले. त्याला अटक केली.

चौकशीत अजूनकाही संशयितांचा तस्करीत सहभाग उघड होण्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. वन कर्मचारी आर. के. बागूल, आर. एस. पठाण यांनी कारवाईत सहभाग घेतला. मांडूळ जातीच्या सापांचा अनेक दिवसांपासून जिल्ह्यात तस्करी होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. संशयित सलीमला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ३ डिसेंबरपर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

SCROLL FOR NEXT