Arrival of foreign visitors in Niphad and Nandur Madhyameshwar area nashik news esakal
नाशिक

Nashik News : महिनाभर आधीच गुंजताहेत पक्ष्यांचे मधुर तराणे; परदेशी पाहुण्यांचा निफाडला मुक्काम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गोदावरी, कादवा, विनता या नद्या आणि त्यातील भरलेले जलाशय तसेच जवळच असलेले नांदुरमध्यमेश्वर धरण यामुळे निफाड शहर आणि परिसर पक्ष्यांचे आवडते ठिकाण बनले आहे.

अशातच गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होवून गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. यामुळे महिनाभर आधीच गुंजताहेत पक्ष्यांचे मधुर तराणे निफाडकरांना ऐकू येवू लागले आहे. निफाड आणि नांदूरमध्यमेश्‍वर परिसरात परदेशी पाहुण्यांचे आगमन होऊ लागले आहे. (Arrival of foreign visitors in Niphad and Nandur Madhyameshwar area nashik news)

पारा घसल्याने निफाड परीसरात थंडी जाणवू लागली आहे. शनिवारी पारा १३.६ अंशावर होता. त्यामुळे सध्या अंगाला झोंबणारी गुलाबी थंडी आणि अन सकाळ सायंकाळी विविध पक्ष्यांचे गुंजणारे सुमधुर तराणे निफाडकरांना मंत्रमुग्ध करणारे आहेत.

जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र आसणार्या नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याचा प्रदेशात देश, विदेशातील हजारो पक्षी स्थालांतर करुन पोचले आहे. पक्ष्यांचे थवे नांदुरमध्यमेश्वर धरण आणि गोदावरीसह तीच्या उपनद्याच्या खोऱ्यातील जलाशयावर दाखल होत आहे. त्यामुळे पक्षी हंगामाला सुरवात झाली आहे. तब्बल तीस दिवस अगोदरच परदेशी पाहुणे येथे मुक्कामी आले आहे.

नांदुरमधमेश्वर पक्षी-अभयारण्यासह निफाड परिसरात वारकरी, थापट्या, हळ, कुंकुं, मुनिया, खंड्या, बंड्या, जांभळी, पाणकोंबडी, राखी, बगळा, रंगित बगाळा, चमच, कवडी, मैना, गप्पीदास, निळ्या गळ्याचा वेडाराघू, हरीयाल, चातक, यासोबत दलदल, ससाणा, इगल, कापसी, घार, शिकारी पक्षी आदींचे आगमन झाले झाल्याचे पक्षीमित्र डॉ. उत्तमराव डेर्ले यांनी सांगितले.

''यावर्षी पाऊस कमी झाला आहे. अशातच महिनाभर आधीच गोदा, कादवेच्या खोऱ्यात, नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यामध्ये हजारो देशी, विदेशी पक्ष्यांचे थवे डेरे टाकत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ही संख्या वाढणार आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षण करणाऱ्यासाठी ही पर्वणीच ठरणार आहे.'' -उत्तमराव डेर्ले, अध्यक्ष निसर्ग मित्र मंडळ निफाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT