Water Crisis esakal
नाशिक

Water Crisis : नांदगावला कृत्रिम पाणी टंचाई; 22 दिवसापासून 17 गावांचा पाणी पुरवठा ठप्प

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : बावीस दिवसापासून ५६ खेडी नळपाणी पुरवठा योजना विस्कळित असताना सोमवारी (ता. २७) उद्भव विहिरीवरील उपसा करणाऱ्या तीनपैकी दोन पंप नादुरुस्त झाल्याने शहरासह लगतच्या सतरा गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला.

नादुरुस्त झालेले व्हीटी पंप दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मात्र कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थ विशेषतः गृहिणी वर्ग संतप्त झाला आहे.

पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडून पडल्यानंतर देखील देखभाल दुरुस्ती करणाऱ्या योजनेच्या अभियंत्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला.

बावीस दिवसापूर्वी सुरवातीला कळमदरी जवळ न्यू पांझणच्या जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. ती दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर वडाळकर वस्तीच्या परिसरात पुन्हा एकदा मुख्य जलवाहिनी फुटली.

ती दुरुस्त होत नाही तोच स्मशानभूमी जवळ पुन्हा जलवाहिनी फुटली. या सगळ्या गळत्यांमुळे अक्षरशः लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

पिण्याच्या पाण्याचा आवर्तन कालावधी देखील लांबत गेला त्यातच सोमवारी (ता.२७) दुपारी गिरणा धरणावरील योजनेसाठी पाण्याचा उपसा करणाऱ्या तीन पंप पैकी दोन बंद पडले. त्यामुळे एका पंपावर उपसा करावा लागत आहे.

यामुळे धरणाच्या उद्भव विहिरीपासून न्यू पांझणच्या जलशुद्धीकरण केंद्रापावेतो कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. परिणामी या ठिकाणापासून ते येवला रस्त्यावरील मुख्य जलकुंभापर्यत पाणी पोचत नसल्याने देखभाल दुरुस्तीच्या पथकातील कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत अशातच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. विशेष म्हणजे योजनेतील मुख्य जलवाहिन्या वारंवार फुटू लागल्याने त्याच्या गळत्या दुरुस्तीला यश येत नाही तोच पुन्हा गळती होत असल्याने भूजलाची पातळी खालावल्याने ग्रामीण भागातील विहिरी हातपंप यासारखे पर्यायी जलस्रोत बंद पडत आहे. शाश्‍वत पर्याय समजली जाणारी योजना विस्कळित झाल्याने कृत्रिम पाण्याचे संकट अधिक गडद झाले आहे.

लाखोचा खर्च पाण्यात

जुनाट झालेल्या जलवाहिन्या,क्षमता कमी झालेली यंत्रसामग्री यामुळे योजनेला कालबाह्य ठरवीत त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लाखो रुपये खर्ची होत असताना देखील वाहिनी सातत्याने फुटत आहे.

धरणाच्या उद्भव विहिरीवर १८० अश्वशक्तीचे तीन पंप असून अनेकदा त्यांच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. काही वेळा नवे व्हीटी पंप बसविण्यात आले तरीही सलग उपशामुळे तेही खराब झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT