Asha and group promoters protest in front of Zilla Parishad nashik news  esakal
नाशिक

Nashik Protest: आशा, गटप्रवर्तक, एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Protest : जिल्ह्यातील आशा, गटप्रवर्तक यांनी प्रलंबित मागण्यांसाठी, तर नाशिक, मालेगाव महापालिकेतील राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रिक्त जागांवर समायोजन करावे, या मागणीसाठी एल्गार पुकारला.

महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा- गटप्रवर्तक संघटना व महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनतर्फे बुधवारी (ता. २५) जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडत आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक यांचा संप हा आठव्या दिवशी कायम असून, मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा व गटप्रवर्तकांनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देत मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. (Asha worker Group Promoter NRHM Contract Staff protest on zp nashik news)

आशा स्वयंसेविकांना ऑनलाइन कामे देऊ नये, आशा व गटप्रवर्तकांना दिवाळीपूर्वी बोनस द्यावा, त्यांचा मोबदला वाढवून द्यावा, आशा स्वयंसेविकांना किमान वेतन लागू करा, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा-गटप्रवर्तक संघटनेतर्फे (आयटक) १८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. संप काळात, संघटनेतर्फे आमदार, खासदार तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

याशिवाय सर्व तालुक्यांत पंचायत समित्यांसमोर निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र, अद्यापही मागण्यांवर तोडगा काढण्यात आलेला नाही. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडत आशा व गटप्रवर्तकांनी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. राज्यातील ७० हजार आशा, तर चार हजार गटप्रवर्तक संपावर गेले आहेत.

यात नाशिक जिल्ह्यातील तीन हजार ६७२ आशा व २३० गटप्रवर्तकांचा समावेश आहे. आंदोलनात सुवर्णा मेतकर, सुनीता गांगुर्डे, नेत्या ज्योती वाघ, पौर्णिमा बेंडकोळी, रेणुका नरवाडे, छाया ढोले, सीमा शिंदे, अर्चना गडाख, सायली महाले, नीता कड, कांचन पवार, श्वेता शिंदे, वंदना कुटे, अर्चना दोंदे, मनीषा बोराडे, सुवर्ण टिळे, मनीषा गायकर, मंगल गोडसे, अरुणा आव्हाड, ज्योती गोडसे आदी सहभागी झाले होते.

"आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत आरोग्य विभागाच्या सचिवांनी दखल घेत गुरुवारी (ता. २६) मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. या बैठकीत मागण्यांबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे; अन्यथा संप सुरू राहील." - राजू देसले, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा गटप्रवर्तक संघटना

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कंत्राटी नर्सेस तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावर समायोजन करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनतर्फे प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडण्यात आला.

या वेळी आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली. राष्ट्रीय अभियानांतंर्गत कंत्राटी आरोग्यसेविका, सहाय्यिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी संवर्गातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर समायोजन केले जाईल, असे आश्वासन पाच महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत देण्यात आले होते.

परंतु अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनतर्फे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याशिवाय समायोजन होत नाही, तोपर्यंत समान वेतन लागू करू नये, औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एनएचएम कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर सामावून घ्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, त्यांचे बदली धोरण तयार करावे, अशा मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. संघटनेचे प्रथमेश कोटस्थाने, चंदा पाटील, सुरेखा बच्छाव, आशिष पवार, एस. डी. पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

Kolhapur Shivaji University: पदव्युत्तर अभ्यासकेंद्रांना कुलूप, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रस्ताव

Jaykumar Rawal : तोंडाला फेस आणणारी घोडदौड; दोंडाईचा निवडणुकीत नगराध्यक्षपद व ७ जागा बिनविरोध, मंत्री जयकुमार रावल यांचा वरचष्मा

SCROLL FOR NEXT