Ashadhi Wari file photo esakal
नाशिक

Ashadhi Wari 2023 : गोदाघाटावर वारकऱ्यांची मांदियाळी; मंदिरात दर्शनासाठी लोटली गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 : पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा रविवारी (ता.४) सकाळी शहरात पोचला. त्यामुळे गोदाघाटावरील स्नानासह विविध मंदिरे वारकरी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली होती.

सायंकाळी गोदाघाटावर मोठ्या प्रमाणावर वाहने उभी करण्यात आल्याने पाय ठेवायलाही जागा नव्हती. (Ashadhi Wari 2023 crowd of Warkari at Godaghat of sant nivruttinath maharaj palakhi nashik news)

निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम नाशिकमध्ये आहे. त्यामुळे सकाळपासून गोदाघाटावर स्नानासाठी मोठी गर्दी उसळली होती. रामतीर्थच नव्हे तर सर्वत्र स्नानासाठी मोठी गर्दी उसळली होती.

गोदावरीतील स्नानानंतर नाशिकमध्ये मुक्कामी थांबलेल्या वारकरी भाविकांनी श्री काळाराम, कपालेश्‍वर, सीता गुंफा आदी ठिकाणी मोठी गर्दी केली होती. गेल्या कित्येक दिवसांनंतर प्रथमच मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती.

काही भाविकांनी तपोवनाला भेट दिल्याने तपोवनातही गर्दी होती. दिंडीचा रविवारी सायंकाळच्या भोजनाची व मुक्कामाची व्यवस्था गणेशवाडी येथील महापालिका शाळेच्या आवारात करण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांची वाहने गोदाघाटाच्या दुतर्फा उभी करण्यात आली होती. सायंकाळनंतर तर शेकडो वाहने गोदावरीच्या तीरावर पार्क करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT