Bribe Case News esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : सहायक फौजदार विजय शिंदेना लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : जिल्ह्यात लाचेच्या घटनांचा क्रम सुरूच असून आज येथील तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार विजय नारायण शिंदे (वय ५१) यांना ३ हजाराची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले.

यामुळे येथील शासकीय कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. (Assistant Faujdar Vijay Shinde arrested while taking bribe nashik bribe crime news)

लाच घेण्याच्या घटना रोजच घडत असल्याने जिल्ह्याची राज्यात चर्चा सुरू आहे. त्यातच येथेही लाच घेण्याचे प्रमाण कमी नसून विविध कार्यालयात तर कामांचे दर ठरलेले असल्याची चर्चा आहे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आनंद यादव यांना लाच घेताना पकडून एक महिनाही झाला नाही, तोच आज पोलिस अधिकाऱ्याला पकडल्याने चर्चला उधाण आले आहे.

आजच्या लाचेच्या घटनेत तक्रारदार यांच्या पत्नीने येवला तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या अदखलपात्र तक्रारीचे रूपांतर दखलपात्र गुन्हा करण्यात येऊ नये यासाठी बक्षीस म्हणून ४ हजार रुपये लाचेची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यातील पहिला हप्ता रुपये ३ हजार लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना सहायक फौजदार शिंदे यास रंगेहात पकडण्यात आले.

त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैशाली पाटील, पो.ना. राजेश गिते, शरद हेंबाडे, अनिल राठोड यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! आयात शुल्क वाढीनंतर आज सर्वात कमी दर; उच्चांकापासून तब्बल 23 हजारांनी स्वस्त; पाहा ताजे भाव

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Sugarcane farmers: नेत्यांच्या साखरसाम्राज्यात अडकले शेतकऱ्यांच्या घामाचे २१८ कोटी; सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटींची थकबाकी

Firefly Festival: काजवा महोत्सवाची परदेशी पर्यटकांना भुरळ; जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील निसर्गप्रेमी अकोल्यात

Rajat Patidar: ट्रॉफी जिंकताच कॅप्टन रजत पाटीदारचा मोठा खुलासा, हे सगळं आधीच ठरलेलं होतं' म्हणत नेमकं काय बोलून गेला? पाहा..."

SCROLL FOR NEXT