Mechanical Broom esakal
नाशिक

Nashik News: माती ऐवजी चिखल; यांत्रिकी झाडूला धाप

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून महापालिकेला रस्ते स्वच्छ करण्यासाठी ३३ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील प्रमुख रस्त्यांची झाडलोट करण्यासाठी महापालिकेने इटली येथून खरेदी केलेल्या चार यांत्रिकी झाडूद्वारे स्वच्छता करताना सुरवातीला चिखल शोषला जात असल्याने यांत्रिक झाडू धाप टाकताना दिसत आहे.

त्यामुळे वीस दिवस उलटले तरी प्रतिदिन १६० किलोमीटर सफाईचे उद्दिष्ट अद्यापही गाठता येत नाही. पावसामुळे साचलेला चिखल साफ झाल्यानंतर नियमित किलोमीटरचे उद्दिष्ट सफल होईल असा दावा करण्यात आला आहे. (At first mud is being absorbed by mechanical broom nashik news)

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून महापालिकेला रस्ते स्वच्छ करण्यासाठी ३३ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. निधीतून सहा विभागांसाठी चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले. यांत्रिकी झाडू खरेदीसाठी प्रत्येकी दोन कोटी सहा लाख रुपये असे एकूण बारा कोटी ३६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

पुढील पाच वर्षाच्या कालावधीत ऑपरेशन, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरविण्यासाठी दरमहा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च होणार आहे. पाच वर्षासाठी २१ कोटी आठ लाख रुपयांच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली. यंत्र पुरवठा करण्यासाठी ऑक्टोंबर २०२३ अखेरपर्यंतची मुदत दिली होती.

परंतु इटलीहून यंत्र प्राप्त झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी प्रक्रिया करण्यात आली. चार डिसेंबरपासून अखेरीस यांत्रिकी झाडू रस्त्यावर उतरविण्यात आले. यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलो मीटर प्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्यांची सफाई करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. विशेष करून धुळ उडू नये तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होवू नये या साठी रात्रीच्या वेळी सफाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून रस्ते झाडताना पावसाळ्यात साचलेला चिखल शोषून घेतला जात आहे. त्यामुळे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्ते झाडण्याचे उद्दिष्ट गाठता येत नाही. संपूर्णपणे चिखलची साफसफाई झाल्यानंतर प्रतिदिनाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.

दरम्यान प्रमुख रस्त्यांच्या स्वच्छतेचे ट्रायल रन सुरू असताना पावसाळ्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठे मातीचे थर साचले असून पहिल्या टप्प्यामध्ये हे थर काढले जात असल्याने काम संथ गतीने सुरू असल्याचा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी केला.

या रस्त्यांवर होतेय स्वच्छता

अशोक स्तंभ ते गंगापूर गाव, मुंबई नाका ते अशोक स्तंभ, सीबीएस ते कॅनडा कॉर्नर, कॅनडा कॉर्नर ते भोसला गेट, त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव, गडकरी चौक ते तिडके कॉलनी, चांडक सर्कल ते मुंबई नाका, महात्मा गांधी रस्ता, मेनरोड, नेहरू गार्डन, शालीमार, पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT