Government Rest House esakal
नाशिक

Nashik : शासकीय विश्रामगृहात विनापरवानगी चित्रपटासाठी ‘Audition’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठी चित्रपटासाठी विनापरवानगी शासकीय विश्रामगृहामध्येच ऑडिशन घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑडिशन परवानगीबाबत आयोजकांकडे विचारपूस केली असता, त्यांनी विश्रामगृहातून पळ काढला.

शासकीय विश्रामगृहावर असा प्रकार सुरु असल्याने याबाबत येथील कर्मचाऱ्यांकडून आक्षेप न घेतल्याने याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Audition for film without permission in government rest house Nashik Latest Marathi News)

मुंबई येथील केसीएस प्रॉडक्शन हाउसतर्फे मराठी चित्रपटासाठी नाशिक येथे विश्रामगृहावर ऑडिशनचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी भगवान बागूल यांच्याकडून केवळ राहण्यासाठी सूटदेखील बुक करण्यात आला होता. चित्रपटासाठी ऑडिशन होणार असल्याचे सर्व समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आले होते. यामुळे मंगळवारी (ता. १) सकाळीच शासकीय विश्रामगृहावर मोठ्या संख्येने तरुण, तरुणी ऑडिशनसाठी दाखल झाले होते. या सर्वांची ऑडिशन रुममध्ये घेतल्या जात होत्या. यासाठी विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांकडून ऑडिशन कुठे सुरू आहे याबाबत आलेल्या सर्वांना माहिती दिली जात होती.

शासकीय विश्रामगृह येथे असे प्रकारे ऑडिशन घेण्यास कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना असा प्रकार सुरू असल्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना कळताच आयोजक यांच्याकडे परवानगीबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर आयोजकांत एकच गोंधळ उडाला आणि त्यांनी तत्काळ विश्रामगृहातून पळ काढला. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता, त्यांनी तत्काळ या ठिकाणी येऊन प्रकाराबाबत माहिती घेत कायदेशीर कारवाईचे आश्‍वासन दिले.

"सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केवळ राहण्यासाठी रूम देण्यात आला होता. चित्रपटाच्या ऑडिशन घेण्यास कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नव्हती. तसेच विश्रामगृहावर अशा कार्यक्रम घेण्यास परवानगीदेखील दिली जात आहे. या ठिकाणी असा प्रकारचे आयोजन केल्याची माहिती मिळताच तत्काळ आयोजकांना तंबी देण्यात आली. तसेच याबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच यापुढे असे प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल."

-किरण पवार, शाखा अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT