ZP Nashik
ZP Nashik esakal
नाशिक

Nashik News: जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान; जिल्ह्यातील 13 लाखांवर बालकांची आरोग्य तपासणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे माता सुरक्षा अभियानासोबतच आरोग्य व कुटुंबकल्याण विभागातर्फे जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियानात जिल्हयातील १२ लाख ८५ हजार बालकांची तपासणी करण्यात येईल. येत्या ६ फेब्रुवारीपासून त्याला प्रारंभ होईल. (Aware Parent Strong Child Campaign Health examination of 13 lakh children in the district Nashik ZP News)

अभियानासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या संख्येनुसार पथक स्थापन करण्यात येणार आहे. शहरी भागातदेखील अशीच पथके असतील. दिवसाला साधारणपणे १५० विद्यार्थ्यांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करावयाची आहे. त्यासाठी कृती आराखडा करण्याच्या सूचना जिल्हा परिषद आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.

अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि महापालिकास्तरावर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल स्थापन केले जाणार आहे. हे अभियान आठ आठवड्यांत पूर्ण करावयाचे असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी संस्था स्तरावर बैठक घेण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.

अभियानाची उद्दिष्टे अशी

- आजारी बालकांना त्वरित उपचार मिळावेत

- प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे

- सुस्थितीत व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे

ही होणार तपासणी

वजन, उंची तपासणे, मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढविणे, आदिवासी भागामधील मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, मुलांमध्ये काही गंभीर आजार आढळल्यास त्वरित पुढील उपचारार्थ रुग्णालयात दाखल करणे.

ही तपासणी प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, अंगणवाडी, बालवाडी, बालसुधारगृहे, सर्व अनाथाश्रम, समाजकल्याण विभागाचे वसतिगृह येथे होईल. प्रत्येक तपासणी तज्ज्ञांमार्फत होणार असून, त्यानंतर उपचार करण्यात येतील.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

तालुकानिहाय बालकांची संख्या

बागालाण (१ लाख ४० हजार ७०), चांदवड (६९ हजार १९६), देवळा (४१ हजार ९८३), दिंडोरी (१ लाख ३ हजार ३११), इगतपुरी (९९ हजार ७६०), कळवण (५७ हजार ७०३), मालेगाव (१ लाख १९ हजार ६४५), नाशिक (३६ हजार २१२), नांदगाव (१ लाख १ हजार ६७४), निफाड (१ लाख ३१ हजार २१९), पेठ (३८ हजार २००), सिन्नर (१ लाख २० हजार २६२), सुरगाणा (६१ हजार ७४४), त्र्यंबकेश्वर (६६ हजार ६४८), येवला (१५ हजार १६४).

"जागरूक पालक सुदृढ बालक अभियानात ग्रामीण भागातील ० ते १८ वयोगटातील बालकांची तपासणी होणार आहे. पुढील दोन महिन्यांत (आठ आठवड्यांत) जिल्हाभरातील १२ लाख ८५ हजार मुलांची तपासणी या अभियानाद्वारे होईल. त्यासाठी लागणारी पूर्वतयारी करण्यात येत आहे." - डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; पोलीस ॲक्शन मोडवर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT