Mahant Shashikant Das Maharaj, Head of Mahaarti on Sharyu River inviting Chief Minister Eknath Shinde to visit Ayodhya esakal
नाशिक

Ayodhya Planning : शिंदे गटातही अयोध्या नियोजनाचा मान नाशिकला! ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न

विक्रांत मते

नाशिक : शिवसेना एकसंध असताना भाजपच्या हिंदुत्वाला जशास तसे उत्तर देण्यासाठी अयोध्या येथील शरयू नदीच्या आरती केली जात होती. त्याचे नियोजन विशेष करून नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडे होते शिंदे गट स्थापन झाल्यानंतरदेखील आता नाशिककडेच अयोध्या दौऱ्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे. (Ayodhya Planning honored to nashik even in Shinde Group uddhav thackeray group nashik political news)

२०१९ च्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. या महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी आपले तत्त्व सांभाळून विकासाचा अजेंडा राबविला. याच दरम्यान भाजपने शिवसेनेला हिनावताना हिंदुत्व सोडल्याची टीका केली जात होती.

त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रामलल्ला दर्शन व अयोध्येतील शरयू नदीच्या आरतीचे नियोजन केले जाऊ लागले. अयोध्या दौऱ्याची जबाबदारी मुख्यत्वे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडे राहिली. दोनदा अयोध्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. आरतीच्या नियोजित तारखांच्या आधी शिवसेनेचे शिष्टमंडळाकडून प्रवासासह अयोध्येतील इव्हेंटचे नियोजन करतात.

शरयू नदीच्या आरतीचा कार्यक्रम दोनदा यशस्वी झाला. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे गटाने शिवसेनेवरच दावा ठोकताना त्यांचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे.

त्याअनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे गटात समाविष्ट करून घेतले जात आहे. मागील महिन्यात नाशिकमध्ये १३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांकडून अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले जात आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

शरयू नदीवरील महाआरतीचे प्रमुख महंत शाशिकांतदास महाराज, महंत छबिरामदास महाराज, महंत शत्रुघ्नदास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घ्यावे व शरयू नदीची आरती करण्याचे निमंत्रण दिले.

निमंत्रणाला मान देताना मुख्यमंत्र्यांनी लवकरच अयोध्येला येण्याचे आश्वासन दिले. या वेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार राहुल शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लवकरच अयोध्या दौरा होणार असून, त्याचे नियोजन नाशिकसह ठाणे येथील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी करणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौऱ्याचे नियोजन आहे."- भाऊसाहेब चौधरी, सचिव, बाळासाहेबांची शिवसेना.

"यापूर्वी शरयू नदीच्या किनारी दोन महाआरती करण्यात आल्या. योग्य नियोजन केल्याने आरतीचे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नियोजन सुरू आहे." - अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT