Bhalekar school building leaking rainwater accumulated in the rooms esakal
नाशिक

Nashik : 4 आण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला; पूर्व कार्यालय आगीतून फुफाट्यात

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : पूर्व विभागीय कार्यालयाची (Eastern Divisional Offices) इमारत धोकादायक झाल्याने कार्यालय भालेकर शाळेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळेच्या इमारतीची अवस्था लक्षात घेतल्यास आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. तर शाळेची दुरुस्ती करण्याचा विचार केल्यास चार आण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, अशी परिस्थिती उद्भवणार आहे. (Bad condition of Bhalekar school building Rain water in every room nashik marathi news )

मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत धोकादायक झाली आहे. महापालिकेकडूनदेखील त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दुर्घटना टाळण्यासाठी कार्यालय भालेकर शाळेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानिमित्ताने काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी साफसफाईदेखील करण्यात आली. सध्या सतत सुरू असलेल्या पावसाने मात्र शाळेच्या इमारतीच्या दुरवस्थेची पोलखोल केली आहे. शाळेच्या प्रत्येक खोलीत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत आहे.

छताला गळती लागलेली आहे. भिंतींना ओल आली आहे. खिडक्या दरवाजांची तुटफुट झालेली आहे. थोडक्यात त्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यात कार्यालय स्थलांतरित करण्यापूर्वी त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

परंतु अधिकाऱ्यांनी केलेली पाहणी आणि सध्या पावसाने केलेली पोलखोल यातून इमारतीच्या दुरुस्तीसाठी जितका खर्च येणार आहे, तितक्या खर्चात किंबहुना त्यापेक्षा काही प्रमाणात अधिक खर्चात नवीन सुसज्ज इमारत निर्माण होऊ शकते.

तसे झाल्यास पूर्व विभागीय कार्यालयाला कायमस्वरूपी हक्काची इमारत मिळण्यास मदत होणार आहे. धोकादायक इमारतीमुळे विखुरलेले कार्यालयाचे विविध विभाग एकाच छताखाली येण्यासही मदत होईल.

सध्या तरी इमारतींच्या खोल्यांमध्ये साचत असलेले पावसाचे पाणी आणि इमारतीची झालेली बिकट अवस्था लक्षात घेता इमारतीत जाणे शक्य नाही, असा विचार बहुधा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला असावा. त्यानिमित्त शाळेची दुरुस्तीचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : नाशिकच्या सुरगाणामध्ये पुन्हा भुकंपाचे धक्के

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT