Onion Chawl
Onion Chawl esakal
नाशिक

Nashik : आता सेन्सरद्वारे शोधा चाळीतील खराब कांदा

मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : सध्या कांद्यास अल्प भाव (onion low rates) असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये साठवला आहे. परंतु, साठवलेला कांदा खराब होऊ न देण्याची काळजी घेणे महत्वाचे असते. नाहीतर भाववाढीच्या अपेक्षेत कांद्याचे नुकसानच पदरात पडते. मात्र, आता चाळीतील खराब वा सडका कांदा शोधता येणारे सेन्सर तंत्रज्ञान (Sensor Technology) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे आणि यामुळे पुढील नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. (bad onion searching sensors in onion storage chawl innovation by farmer in Nashik News)

सावकी (ता. देवळा) येथील सुरेश पाटील, प्रकाश पाटील यांनी आपल्या कांदा चाळीत अशी यंत्रणा बसवून या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने इतर कांदा उत्पादक शेतकरी येथे भेट देत आहेत. या कांदा चाळीत सेन्सरची ही उपकरणे ठेवली असून, कांद्याच्या आद्रतेबाबत तसेच अमोनिया व इतर वायूंच्या आधारे चाळीतील कांदा कोणत्या भागात खराब होतो आहे, ते सेन्सरद्वारे दर्शवले जाते. यामुळे खराब होणारा कांदा लगेचच लक्षात येऊन तो बाहेर काढला जाऊन बाकीचा कांदा खराब होण्यापासून वाचवता येतो. पाटील कुटुंबियांनी प्रायोगिक तत्वावर त्यांच्या साठ फुटी चाळीत जवळपास चारशे ते साडेचारशे क्विंटल कांदा साठवला आहे. त्यात या सेन्सरचे दहा युनिट बसवत त्या माध्यमातून कांदा सडतो आहे किंवा खराब होतो आहे ते कळण्यास मदत होत आहे. प्रत्येक कप्प्यात पाईपमधून हे युनिट खाली सोडले जातात.

गोदाम इनोव्हेशन या कंपनीच्या सहकार्याने सदर यंत्रणा बसवली आहे. यासाठी सध्या सव्वा ते दीड लाख रुपये खर्च लागत असला तरी त्याचे महत्व मोठे आहे. कांद्याचे मुल्य वाढते असल्यावर याचे महत्व अधिक अधोरेखित होणार आहे.

शासनाने काही सबसिडी दिल्यास हा खर्च कमी होणार आहे. या उपक्रमासाठी देवळा कृषी विभाग व आत्मा यांचेही सहकार्य लाभत असून, याबाबतचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. जिल्ह्यात अशा आठ ते दहा चाळींवर सेन्सर यंत्रणा बसवण्यात आली आहे. या चाळींतील यंत्रणा पाहण्यासाठी शेतकरी भेट देत आहेत.

"खराब होणारा कांदा शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकवतो. कांदा खराब होतो आहे हे कळेपर्यंत बराच कांदा सडतो. त्यासाठी हे सेन्सर तंत्रज्ञान महत्वाचे काम करते. त्यामुळे पुढील काळात ही यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे."
- कल्याणी शिंदे, संचालिका, गोदाम इनोव्हेशन

"प्रयोगशील व उपक्रमशील शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. कांदा साठवणूक करणे व टिकविण्यासाठी आम्ही ही सेन्सर यंत्रणा चाळीत बसवली आहे. तिची उपयोगिता निश्‍चित सिद्ध होईल, असा विश्‍वास आहे."
- प्रकाश पाटील, सावकी, ता. देवळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT