नाशिक

Balasaheb Thorat News : बाळासाहेब वाघ यांच्या योगदानाने वाढला दर्जा : थोरात

सकाळ वृत्तसेवा

Balasaheb Thorat News : (कै.) बाळासाहेब वाघ यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर नेहमीच भर दिला. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर त्यांचा कायम कटाक्ष राहिला.

कृषी अभ्यासक्रमांबाबत ते विशेष जागृत होते. त्यांनी केलेला पाठपुरावा आणि योगदानामुळेच राज्यातील कृषी महाविद्यालयांचा दर्जा वाढल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (ता. १९) केले. (balasaheb thorat statement about contribution of Balasaheb Wagh in Agricultural Colleges in State nashik news)

कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित (कै.) बाळासाहेब वाघ जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, नीलिमाताई पवार, शकुंतलाताई वाघ, शेफाली भुजबळ, माजी आमदार अनिल कदम, ‘मविप्र’ अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, स्माईल आणि स्पिनॅच संस्थेचे सचिव अजिंक्य वाघ, माजी नगरसेवक शाहू खैरे, राहुल दिवे आदी उपस्थित होते.

पुणे येथे उच्चशिक्षण घेऊन बाळासाहेबांनी स्वअनुभवातून वाटचाल केली. आयुष्य कसे जगावे, याचे मूर्तिमंत उदाहरण बाळासाहेब वाघ. जलसंधारण क्षेत्रात त्यांनी मोठे काम उभे केले. कर्मवीर बंधाऱ्यांची निर्मितीही त्यांच्याच काळात झाली. आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून भाऊंचे कार्य नेहमीच स्मारणात राहील, असे श्री. थोरात यांनी सांगितले.

भाऊंनी आयुष्यभर काम केले. कोणत्याही संस्थांमध्ये महिलांना सुरक्षितता देणे, बारीक अवलोकन करणे, सातत्याने बैठक घेऊन अपडेट राहणे हे त्यांचे गुण अंगीकारण्याची गरज आहे. ते स्वतः एक विद्यापीठ होते, असे ‘मविप्र’च्या माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी सांगितले.

जागतिक पातळीवरील विद्यापीठ : आमदार तांबे

काही लोक जन्माला येतात आणि कर्तबगारी दाखवितात. भाऊंनी संधीचे सोने करीत शैक्षणिक वटवृक्ष उभा केला. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. त्यांच्या कामातील सातत्यामुळे संस्थेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर विद्यापीठ उभे करण्यात यश आल्याचे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृती मानधना - पलाश मुच्छलचं लग्न रद्द, स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती; म्हणाली...

Goa Night Club Fire Incident : गोव्यातील सिलिंडर स्फोट प्रकरणी मोठी कारवाई ! नाईट क्लब मालकाला अटक, आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू

Viral Video: भक्त हत्तीणीवर अभिषेकासाठी पाण्याचा वर्षाव करत होते, एका कर्मचाऱ्याने थांबवलं तर हत्तीणीने उचलून फेकलं!

Latest Marathi News Live Update : "इंडिगोच्या मक्तेदारीला परवानगी देणाऱ्या सरकारचे हे अपयश नाही का?..."- पवन खेरा

Sharad Pawar: ‘आघाडी’चे सर्वाधिकार पवारांना! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT