state bank abhona
state bank abhona 
नाशिक

दोनच कर्मचारी ओढतात ८० गावांचा कारभार; अभोण्यात स्टेट बँक ग्राहकांची प्रचंड गैरसोय

किरण सूर्यवंशी

नाशिक/अभोणा : येथील स्टेट बँक शाखेत पुरेसे कर्मचारी नसल्याने ग्राहकांना त्यांचे कोणतेही व्यवहार वेळेवर करता येत नाहीत. सतत तीन-चार दिवस चकरा मारूनही काम होत नसल्याने ग्राहकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. किमान सहा कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ एक शाखा व्यवस्थापक व एक सहाय्यक यांनाच परिसरातील ७० ते ८० गावांच्या कारभाराचा गाडा ओढावा लागत आहे. 

ग्राहकांवर चकरा मारण्याची वेळ

कळवण तालुका पश्चिम पट्ट्यात गुजरात सीमेपर्यंत अभोणा येथे एकमेव स्टेट बँकेची शाखा, शिवाय सुरगाणा तालुक्यातील काही गावे याच शाखेला जोडल्याने कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. दूर अंतरावरून ग्राहकांना पैसे काढण्यासाठी किंवा बँक व्यवहारासाठी अनेकदा चकरा माराव्या लागतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तीन वर्षांपासून कृषी विभागासाठी स्वतंत्र अधिकारीच नसल्याने कृषी क्षेत्रासाठी शासनाच्या कोणत्याही योजना राबविल्या जात नाहीत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांवर सतत अन्याय होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, तहसीलदार यांनी वारंवार सूचना देऊनही विभागीय व्यवस्थापकांकडून नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली नाही. 

अभोणा व्यापारी बाजारपेठ असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी, विविध व्यावसायिक यांनाही बँकिंग व्यवहार करताना तिष्ठत रहावे लागते. शाखा व्यवस्थापकांना व्यक्तिगत कर्ज प्रकरण पडताळणीसाठी बाहेर पडता येत नाही. तसेच बँकिंग व्यवहारासंबंधी ग्राहकांच्या समस्या जाणून घेता येत नाहीत. विभागीय व्यवस्थापकांनी विशेष लक्ष घालून, पुरेशा कर्मचाऱ्यांची तत्काळ नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे. 

येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे अनेक कांदा व्यापारी व कांदा उत्पादक शेतकरी यांना अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे बँकिंग व्यवहार करताना खूप अडचणी येत आहेत. वेळेवर आर्थिक व्यवहार न झाल्याने संपूर्ण बाजारपेठेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. 
-मनोहर पवार, अध्यक्ष, कांदा व्यापारी असोसिएशन, अभोणा 
 

फक्त दोनच कर्मचारी असल्याने, संपूर्ण व्यवहार सांभाळताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. आम्ही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतोय; पण कामाचा व्याप जास्त आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी विनंती केली आहे. ग्राहकांना तिष्ठत ठेवणे आम्हालाही क्लेशदायक वाटते. 
-संदीप पाटील, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अभोणा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT