student justice.jpg 
नाशिक

बँकेची एकच अक्षम्य चुकी..अन् गरीब विद्यार्थ्याच्या नशिबी मात्र...

सागर आहेर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ऑनलाइन व्यवहारांत अनेक ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सायबर क्राइमकडे येत असतात. पण बॅंकेच्या एका चुकीमुळे कोणाचे किती नुकसान होऊ शकते याचा कदाचित अंदाज बॅंक कर्मचाऱ्यांना नसावा..नाहीतर अशी चुक होऊनही ती सुधारण्या ऐवजी असे स्पष्टीकरण ऐकायला आले नसले. आणि यामुळे सरकारी बँकांतील ग्राहकांच्या खात्यांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे. हा प्रकार बँकेच्या क्लार्कच्या चुकीने घडल्याचे समोर आले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.

त्याच झालं असं की 

कुंदेवाडी (ता.निफाड) येथील विक्रम भाऊसाहेब टर्ले हा विद्यार्थी ओढा येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशनसाठी शिकत असताना त्या वर्षाची शिष्यवृत्ती रक्कम रुपये ३३,८९५ ही मंजूर झालेली होती. पण आधारकार्ड हे बँकेच्या खात्यास लिंक करतेवेळी तत्कालीन बँक कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे विक्रमचे आधारकार्ड हे सागर बारहाते नावाच्या विद्यार्थ्यांच्या खात्यास जोडले गेले.

फक्त बँकेचे उंबरठे झिजवतो आहे...

ज्यावेळी तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने आधारकार्ड जोडणी केलेल्या बँक खात्यास शिष्यवृत्ती रक्कम ३१ मार्च २०१८ मध्ये वितरित करण्यात आली.
तेव्हा पर्यायाने विक्रमची आलेली शिष्यवृत्ती बँकेच्या चुकीमुळे दुसऱ्याच्या खात्यात जमा झाल्याने विक्रम गेल्या १ एप्रिल २०१८ पासून बँकेचे उंबरठे झिजवतो आहे. अनेकदा बँकेस विनंती करून तत्कालीन बँक कर्मचाऱ्यानीं सागर बारहाते या विद्यार्थ्यांकडून परस्पर पैसे वसूल करण्याचा सल्ला दिला.
 या अक्षम्य चुकीमुळे विक्रमचे शैक्षणिक नुकसान होऊन मानसिक त्रास ही झालेला आहे.


माझे शिक्षण खंडित होऊन मला मानसिक त्रास 

बँकेच्या हलगर्जीपणामुळे माझे शिक्षण खंडित होऊन मला मानसिक त्रास झालेला आहे. - विक्रम भाऊसाहेब टर्ले, विद्यार्थी

मी जुलै २०१८ मध्ये शाखाधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर पैसे जमा झालेल्या संबंधित सागर बारहाते यास नोटीस दिली असून विक्रमचे पैसे मिळवून दिले जातील - अभिजीत जाधव, शाखा व्यवस्थापक, इंडियन बँक चांदोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT