Officials and farmers of farmers' organizations putting up a sign banning voting to those who banned exports. esakal
नाशिक

Nashik News : निर्यातबंदी करणाऱ्यांना आता मतदान बंदी! विठेवाडी येथे प्रहार शेतकरी संघटनेने लावला लक्षवेधी फलक

'ज्यांनी केली वारंवार शेतमालाची केली निर्यातबंदी, त्यांना आता मतदान बंदी' अशा घोषणा देत तशा आशयाचा फलक लोह़णेर - कळवण या राज्यमार्गांवरील विठेवाडी येथील चौफुलीवर लावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

देवळा : मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सोमवारी (ता.१५) विठेवाडी- झिरेपिंपळ येथे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या आवाहनास प्रतिसाद शिवारातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सत्ताधारी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा सामुदायिक निषेध केला.

'ज्यांनी केली वारंवार शेतमालाची केली निर्यातबंदी, त्यांना आता मतदान बंदी' अशा घोषणा देत तशा आशयाचा फलक लोह़णेर - कळवण या राज्यमार्गांवरील विठेवाडी येथील चौफुलीवर लावला आहे. हा फलक लक्षवेधी ठरला आहे. (banned exports now banned from voting Vithewadi Prahar Farmers Association put up eye catching board Nashik News)

‘ज्यांनी आमच्या शेतमालाची माती केली, त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी खूणगाठ बांधत घोषणाबाजी करण्यात आली.

शहरी भागातील मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बळी दिला जातो आहे, याला आपण सर्व ताकदीनिशी विरोध करून येणाऱ्या निवडणुकीत आपली संघटित ताकद दाखवून दिली पाहिजे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी गावातील तरुण कांदा उत्पादक शेतकऱ्यासमोर केले.

गावातील तरुणांनी सकाळी फलक लावून विधिवत पूजन करत केंद्र सरकारला सद्बुद्धी सुचावी म्हणून संक्रांती निमित्त साकडे घालण्यात आल्याचे सांगितले. विठेवाडी, झिरेपिंपळ गावातील शेकडो कांदा उत्पादक तसेच राजा शिवछत्रपती तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गावातील सामाजिक कार्यकर्ते निंबा निकम व प्रवीण निकम यांच्या शिवप्रेमी मित्रमंडळाने लक्षवेधी फलक लावून अनावरण केले.

शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम, मिलिंद निकम, नंदकिशोर निकम, संजय निकम, तानाजी निकम, संजय सावळे, ललित निकम, ईश्वर निकम, लहानू निकम, स्वप्नील निकम, रावसाहेब निकम, पिंटू निकम, कैलास कोकरे, बंडू आहेर, बंटी अहिरे, योगेश हिरे, मधुकर निकम आदींसह युवा शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT