Barti (1).jpg 
नाशिक

'बार्टी'च्या समतादूतांवर उपासमारीची वेळ; सहा महिन्यांपासून वेतन नाहीच

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (इगतपुरी) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘बार्टी’मधील कार्यरत समतादूतांवर सहा महिन्यांपासून पगार न मिळाल्याने उमासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कुटुंब चालवायचे कसे, उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत. 

सहा महिन्यांपासून वेतनापासून वंचित 

समतादूत हा पथदर्शी प्रकल्प राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुका व गाव-खेड्यात राबविला जात आहे. अनुसूचित जातीतील, तसेच समाजातील दुर्बल वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकसह सर्वच पातळीवर विकास व्हावा म्हणून ‘बार्टी’ मुख्यालयाच्या सूचनेनुसार हे समतादूत काम करीत आहेत. समता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक जाणीवजागृती, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता, सांप्रदायिक सहिष्णुता व सद्‍भावना समाजाच्या विविध घटकांमध्ये वाढविण्यासाठी व जातीय दुर्भावनांचे व अंधश्रद्धांचे उच्चाटन करण्यासाठी तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधांबाबत जाणीव निर्माण करण्यासाठी शासनाने समतादूत हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. 
त्यासाठी प्रशिक्षण घेऊन राज्यात सुमारे साडेतीनशे समतादूतांची नेमणूक केली आहे. 

गावनिहाय केले सर्वेक्षण

या समतादूतांनी गावनिहाय सर्वेक्षण, संविधान साक्षर अभियान, शेतकरी सर्वेक्षण, रेशीम अभियान, विधवा-परित्यक्ता महिलांचे सर्वेक्षण, शासकीय योजनांची माहिती, ऑनलाइन प्रबोधन आदी कामे केली. कोरोनाच्या काळातही प्रवासाची पुरेशी साधने उपलब्ध नसताना गावपातळीवर प्रत्यक्ष जाऊन संपूर्ण राज्यात ५९ अनुसूचित जातींचे सांख्यिकीय व वस्तुनिष्ठ सर्वेक्षण व प्रबोधन केले. 

अद्याप न्याय नाही... 

याबाबत समतादूत म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी म्हणाले, की पाच वर्षांषासून समतादूत म्हणून काम पाहतो आहोत. शासनाने सहा महिने आमचा पगार न दिल्याने राज्यातील साडेतीनशेहून अधिक समतादूतांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॅाकडाउनमध्येही आमचे काम सुरूच असून, वेतन मात्र मिळत नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्यातील समतादूतांना तातडीने पगार मिळावा, यासाठी शासनाकडे मागणीही केली आहे; परंतु आम्हाला अद्याप न्याय मिळालेला नाही. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT