police nashik.jpg 
नाशिक

'त्या' पोलीसांमुळे नोकरी बरोबर छोकरीही मिळाली!

सतीश निकुंभ

नाशिक/ सातपूर : सुरक्षारक्षकाने पूर्वग्रह दूषित मनाने कंपनीच्या सर्वोत्कृष्ट कामगाराला अडकवत त्याची नोकरी घालवली. व्यवस्थापनाने कुठलीही चौकशी न करता त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांना संशय आला, पोलिसी खाक्‍या दाखविताच सत्य बाहेर आले, व्यवस्थापनाला चूक समजली. कामगाराला पुन्हा कामावर घेतले. मुलाची नोकरी गेल्याचे समजताच विवाहासाठी आलेले विघ्नही टळले. 

कामगाराला अडकवण्यासाठी रचला 'डाव' ​
सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत सुरक्षारक्षकाने कामगाराला अडकवण्यासाठी सहकाऱ्यांच्या संगनमताने डाव रचला. संबंधित कामगार आजारी असल्याने तो सेकंडशिपमध्ये डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आठ दिवसांपासून कामावर असताना गोळी घेण्यासाठी चहाच्या सुटीत कंपनीत लावलेल्या वाहनात ठेवलेली गोळी घेत होता. औषधोपचाराच्या तिसऱ्या दिवशी सुरक्षारक्षकाने कामगार वाहनाजवळ येताच त्याने कंपनीच्या वस्तू गाडीत ठेवल्याचा आरोप करत आरडाओरडा केला. आपल्या सहकारी सुरक्षारक्षकांना बोलावून कागदपत्रे रंगवली. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने वरिष्ठ व्यवस्थापक येणार नाही, हे लक्षात घेत अहवालही तयार केला व मानव संसाधन (एचआर) प्रमुखाला पाठविला. एचआर प्रमुखाने चौकशी न करता तीनवेळा सर्वोत्कृष्ट कामगार पुरस्कारप्राप्त कामगाराला कामावरून काढण्याचा निर्णय घेत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तयारी केली. सातपूर पोलिसांकडे ही तक्रार येताच चौकशी सुरू केली. चौकशीत सत्य बाहेर आले.

चौकशीत सत्य बाहेर आले अन्...

व्यवस्थापनाला आपली चूक कळताच त्यांनी सातपूर पोलिस ठाण्यातच संबंधित कामगाराला कामावर घेत असल्याचे सांगितले. दरम्यान, या कामगाराचे लग्न जमले होते. त्यातच कामावरून कमी करण्याचा निरोप पोचल्याने मुलीच्या घरच्यांनी विवाह होण्यासंदर्भात विचार करीत असल्याचा निरोपही कळवून दिला. ही बाब कामगाराने पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांना सांगताच त्यांनी क्षणाचा विलंब न लावता मुलीच्या आप्तस्वकीयांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. मुलीकडील मंडळीने त्वरित विवाहास होकार दिला. पोलिसांच्या तत्परतेने भावनाविवश झालेल्या कामागराची निरीक्षक हांडे यांनी गळाभेट घेत त्यास शुभेच्छा दिल्या व व्यवस्थापनास आपल्या स्तरावर सत्यता पडताळूनच पोलिस ठाण्यापर्यंत येण्याचा सल्लाही दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT