Circus
Circus esakal
नाशिक

Circus : कोरोनापूर्वी देशात होत्‍या 100 अन् आता उरल्‍या अवघ्या 5 सर्कस!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळित झाल्‍याची अनेक उदाहरणे समोर आली. कुणाला नोकरी गमवावी लागली, तर कुणाचा उद्योग-व्‍यवसाय प्रभावित झाला. पण हजारो कलावंतांच्‍या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्‍या सर्कसचा व्‍यवसाय कोरोनानंतर पूर्णपणे मोडकळीस आलाय.

कोरोनापूर्वी देशात सुमारे शंभर सर्कस कार्यरत असताना, सध्याच्‍या स्‍थितीत ही संख्या अवघ्या पाचवर आलेली आहे. मैदान भाडे, जनावरांवरील बंदीमुळे सर्कसचे अस्‍तित्‍व धोक्‍यात आल्‍याचे व्‍यवसायातील जाणकारांनी सांगितले.

मनोरंजनाची साधने अत्यंत मर्यादित असताना, गावात किंवा शहरात आलेली सर्कस चिमुकल्‍यांपासून ज्‍येष्ठांपर्यंत आकर्षणाचा केंद्र राहायची. चित्तथरारक प्रात्‍येक्षिके, वाघ, माकड, हात्ती यांसह अन्‍य प्राण्यांचे करतब, लोटपोट होऊन हसविणारे जोकरचे किस्से सर्कसच्‍या माध्यमातून अनुभवायला मिळायचे.

परंतु काळानुरुप मनोरंजनाची भरपूर साधने उपलब्‍ध होत गेल्‍याने स्‍मार्टफोनच्‍या एका क्‍लिकवर हवा तो कन्टेंट उपलब्‍ध होऊ लागला आहे. अशात सर्कस व्‍यवसायाला घरघर लागली आहे.

कोरोना महामारीपूर्वी सर्कसमालक कसेबसे खेळ लावताना सर्कशीवर अवलंबून असलेल्‍या हजारो कलावंतांच्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मिटवत होते.

परंतु कोरोना महामारीदरम्‍यान सारेकाही ठप्प असताना छोट्या सर्कसला गाशा गुंढाळावा लागला. या समस्‍येच्‍या कालावधीत बोटावर मोजण्या इतके मोठे सर्कस टिकाव धरू शकलेले आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

या सर्कस राहिल्‍या सुरू

सध्या देशात एशियाड सर्कस, जेमिनी सर्कस, रम्‍बो सर्कस, गोर्डन सर्कस, जम्‍बो सर्कस, ग्रेट बॉम्‍बे सर्कस कार्यारत आहेत. उर्वरित सर्व सर्कस ठप्प झालेल्या आहेत.

दिवसाचा खर्च सुमारे साठ हजार

वाहनाच्‍या चाकाप्रमाणे सर्कशीचे चक्र फिरतच राहाते. सुवर्णकाळात कधीकाळी लाखो रुपयांचा गल्‍ला जमविणारा सर्कस व्‍यवसाय सध्या नुकसान सहन करून चालवावा लागत असल्‍याचे व्‍यवस्‍थापकांचे म्‍हणणे आहे.

कलाकारांचे मानधन, सर्कस साहित्‍याचे दळणवळ, मैदानाचे भाडे, मंडप बांधणीसाठी मजुरांची मजुरी असा सरासरी दिवसाला साठ हजार रुपयांपर्यंत खर्च होत असल्‍याची माहिती दिली.

...तरच सर्कस व्‍यवसाय टिकेल

सर्कसकरिता जागा भाडेतत्त्वावर घेताना पूर्वी नाममात्र भाडे आकारले जात. परंतु २००८ ला केलेल्‍या नियमातील बदलांमुळे तेव्‍हापासून व्‍यावसायिक दराने भाडे सर्कस व्‍यवस्‍थापनाला मोजावे लागतेय. यामुळे खर्चात मोठी वाढ झालेली आहे.

दुसरीकडे जनावरांच्‍या वापरावर बंदी घातल्‍याने सर्कसमालकांनी याबाबत सर्वोच्च न्‍यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या दोन प्रमुख अटींसंदर्भात शासनाने सहानुभूती दाखविली तरच सर्कस व्‍यवसाय टिकेल, असे जाणकार सांगतात.

"कोरोना महामारीनंतर शंभरवरून सर्कसची संख्या अवघी पाचवर आलेली आहे. पुढील काही वर्षांमध्ये या सर्कसदेखील सुरू राहतील का, याची शाश्‍वती नाही. प्राणिसंग्रहालयांपेक्षाही चांगल्‍या पद्धतीने आम्‍ही प्राण्यांची काळजी घेत असल्‍याने आम्‍हाला सर्कसमध्ये प्राण्यांच्‍या सहभागाची अपेक्षा असून, याबाबत याचिका दाखल केलेली आहे."

- अलंकेश्‍वर भास्‍कर, वरिष्ठ व्‍यवस्‍थापक, एशियाड सर्कस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT