corona nashik2.jpg 
नाशिक

एका कोरोनाबाधित रुग्णामागे मनपाकडून 'इतक्या' जणांची होते तपासणी; वाचा सविस्तर

विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेने तपासणी मोहिमेला गती दिली. त्यातून आतापर्यंत शहरात एक लाख ४७ हजार संशयितांच्या तपासणीनंतर ३७ हजार ५८५ कोरोनाबाधित आढळले. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक ३४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार दोन लाख ४५ हजार ४६८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे ऑनलाइन महासभेत देण्यात आली.

महासभेत वैद्यकीय विभागाची माहिती 

ऑनलाइन महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाकडून कोरोनासंदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती विचारण्यात आली. त्या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी माहिती दिली. ६ एप्रिलला पहिला कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर एक लाख ४७ हजार ८१६ संशयित रुग्ण तपासण्यात आले. त्यात ३७ हजार ५८५ कोरोनाबाधित आढळले. एक लाख १३ हजार ८०८ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत सात हजार ९२४ प्रतिबंधित क्षेत्रे तयार करण्यात आली. सध्या एक हजार ९८० प्रतिबंधित क्षेत्रे अस्तित्वात आहेत. शहरातील साडेचार लाख घरांमधील १५ लाख ७१ हजार १९१ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. तपासणी करताना प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप, रक्तदाब, मधुमेह या प्रकारच्या आजारांच्या रुग्णांचा डाटा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

कोरोना लढाईचे वास्तव 

- मिशन झीरो नाशिकअंतर्गत ७५ हजार नागरिकांची तपासणी 
- मोहिमेत दहा हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले 
- चार लाख ४४ हजार ९१५ नागरिकांना अर्सेनिक अल्बम गोळ्यावाटप 
- महापालिका व खासगी ३९ रुग्णवाहिकेतून सात हजार रुग्ण दाखल 
- एक कोटी ६० लाख १६ हजार २७० रुपये रकमेची लेखापरीक्षकांकडून वजावट 
- शहरात ५७ कोविड सेंटर स्थापन 
- कोविड सेंटरमध्ये एक हजार ७३५ खाटा 
- नवीन बिटको रुग्णालयात २०० पैकी शंभर खाटा ऑक्सिजनसाठी 
- ४८ खासगी कोविड सेंटरमध्ये एक हजार ३३४ खाटा 
- खासगी सेंटरमध्ये ५७७ ऑक्सिजन खाटा, २६३ आयसीयू खाटा, तर ६९ व्हेंटिलेटर 

शहरात १३२ व्हेंटिलेटर 

कोविड रुग्णालयात ६३० खाटा असून, ३६५ ऑक्सिजन खाटा, १०९ आयसीयू खाटा व ६३ व्हेंटिलेटर आहेत. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १५० खाटा, १०० ऑक्सिजन खाटा, २० आयसीयू खाटा व नऊ व्हेंटिलेटर आहेत. शहरात सरकारी व खासगी रुग्णालय मिळून एकूण ९४२ ऑक्सिजन खाटा, ३५८ आयसीयू खाटा व १३२ व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध आहेत.  

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT