E- Challan Scam esakal
नाशिक

Nashik E- Challan Scam: फेक ‘इ-चलन’ मेसेजपासून सावधान! वाहतूक शाखेचा सावधगिरीचा इशारा; अशी घ्या खबरदारी

वाहनचालकांना इ-चलनचा दंड भरण्यासाठीचा फेक ‘इ-चलन’चा मेसेज पाठवित असून, त्यामाध्यमातून वाहनचालकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सायबर भामटे सर्वसामान्यांना गंडा घालण्यासाठी काय अन्‌ कोणत्या क्लृप्त्या वापरतील हे सांगता येत नाही. वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांना दंडात्मक कारवाई करण्यासाठी ऑनलाईन इ-चलनद्वारे दंड आकारला जातो.

याच संधीचा सायबर भामट्यांनी फायदा घेत, वाहनचालकांना इ-चलनचा दंड भरण्यासाठीचा फेक ‘इ-चलन’चा मेसेज पाठवित असून, त्यामाध्यमातून वाहनचालकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.

प्रत्यक्षात, असा कोणताही मेसेज वाहतूक पोलिस शाखेकडून पाठविला जात नसल्याचे शहर वाहतूक शाखेने स्पष्ट केले असून, वाहनचालकांनीही अशा कोणत्याही मेसेजला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. (beware Messages Fake E Challan Fraud Crime Traffic Department Caution Alert Take precaution Nashik)

शहरात ठिकठिकाणी शहर वाहतूक पोलिस शाखेकडून बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई केली जाते. ही कारवाई करीत असताना पोलिसांकडून इ-चलनद्वारे ऑनलाईन दंड आकारला जातो. परंतु दंड आकारल्यानंतर त्यासंदर्भात कोणताही मेसेज वाहतूक शाखेकडून नंतर वाहनचालकांना पाठविला जात नाही.

मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये वाहनचालकांना ‘वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुमच्या वाहनावर ई-चलनअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे’, अशा आशयाचा बनावट इंग्रजी मेसेज येत आहे.

प्रत्यक्षात सदरचा मेसेज शहर वाहतूक पोलिस शाखा नव्हे तर सायबर भामटे पाठवित आहेत. या मेसेजसोबतच संशयित भामटे दंडाची रक्कम भरण्यासाठी लिंक पाठवितात. शहरातील अनेक वाहनचालकांना या स्वरूपाचे बनावट ‘ई-चलन’चा फेक मेसेज पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे.

नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर सायबर भामटे वाहतूक ई-चलनचा मेसेज पाठवून गंडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, वाहतूक विभागाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त आनंदा वाघ यांचे पथक फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा शोध घेत आहेत.

सावधगिरीचे आवाहन

ज्या वाहनचालकांना सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲपद्वारे ई-चलनचे मेसेज पाठविले आहेत, त्यांनी लिकंवरून कोणतेही ई-पेमेंट न करता वाहतूक पोलिसांकडे चलनची खात्री करण्याचे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

तसेच वाहतूक पोलिसांच्या नावे कोणतेही ॲप कार्यान्वित नसल्यामुळे व्हॉट्सॲपवर येणाऱ्या लिंकवरून ॲप डाउनलोड न करण्याचेही आवाहन वाहतूक पोलीस शाखेने केले आहे.

अशी घ्या खबरदारी

‘ई-चलन’संदर्भातील मेसेज ‘टेक्स्ट’ स्वरूपात असतात. वाहतूक पोलिस व्हॉट्सअपवरून कोणालाही मेसेज पाठवत नाहीत. वाहतूक पोलीसांनी बेशिस्त वाहनचालकावर दंड केल्यास त्याचे छायाचित्रही पोलिस पाठवत असतात.

त्याचप्रमाणे https://mahatrafficechallan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ई-चलनसंदर्भात वाहनचालक खात्रीही करू शकतात.

"फेक मेसेज व एपीके ॲप कोणीही डाउनलोड करू नये. ई-चलनसंदर्भात काही शंका, तक्रार किंवा अडचण असल्यास वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांशी थेट संपर्क साधावा. इ-चलनबाबतचा फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत."

- आनंदा वाघ, सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

Trump Tariffs: अमेरिकेच्या 'टॅरिफ'वर मोहन भागवत पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, आम्ही असो वा नसो...

SCROLL FOR NEXT