woman using whatsapp.jpg 
नाशिक

'महिला मंडळ व्हॉट्सअप वापरताय?'...मग ही बातमी तुमच्यासाठी

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा ऑनलाईन भामट्यांकडून गैरफायदा घेतला जात असून, शहरातील काही महिलांचे व्हाट्सअप हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरी महिलांनी सुरक्षिततेची सेटिंग करून घेण्याचे आवाहन नाशिक सायबर पोलिसांनी केले आहे.

फावल्या वेळेत इंटरनेटचा वापर वाढला

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभर संचारबंदी लागु आहे. त्यामुळे नाइलाजाने का असेना नागरिक घरातच बसून आहेत. त्यामुळे या फावल्या वेळेत इंटरनेटचा वापर वाढला आहे, तसेच जास्तीत जास्त लोक सोशल मीडियावर सक्रिय आहेत. नेमका याच गोष्ठीचा ऑनलाईन भामट्याकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता होती. तर नागरिकांना घराबाहेर जात येत नसल्याचे हेरून ऑनलाईन भामट्याकडून गंडा घालण्यासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. आर्थिक व्यवहार ऑनलाईनने होत असल्याने त्याचसाठी अँप डाउनलोड केले जात आहेत. यात संशयितांनी शहरातील महिलांच्या व्हाट्सअप वर ऍपची लिंक तयार करून पाठविली जात आहे. यज लिंकवर क्लिक केले कि तो व्हाट्सअप हॅक होते आणि त्यावरील संपर्क क्रमांक संशयिताला हक करता येते. तत्याचा गैरवापर केला जात आहे, संशयितांकडून त्या क्रमांकावर संपर्क साधून पैशांची मागणी केली जात आहे. या संदर्भातील तीन तक्रारी नाशिक सायबर पोलिसांकडे आल्या आहेत.

सुरक्षात्मक उपाय करा 

सोशल मीडियाचा वापर करताना फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्ट्राग्राम यासाठी जनरेट ओटीपी क्रमांक कोणालाही शेअर करू नका, याबाबत आलेले मेसेजकडे दुर्लक्ष करा, तसेच अकाऊंटच्या सुरक्षिततेसाठी two setp verification / authentication तात्काळ अक्टिवेट करा, तसेच कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नये असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी केले आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

AI cough test for TB: खोकल्याच्या आवाजातून कळणार टीबीचा धोका? राजस्थानमध्ये AIच्या मदतीने नवा प्रयोग

कतरिनाचा दीर पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात? सनी कौशलच्या 'त्या' एका पोस्टने चर्चेला उधाण, Viral

२१ वर्षीय तरुणानं १७ वर्षीय प्रेयसीसोबत नको ते केलं, आई-वडील घरी परतताच लेक अस्वस्थ पडून, तर तरूण...; नवी मुंबईत काय घडलं?

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

SCROLL FOR NEXT