Nashik Latest Crime News esakal
नाशिक

भद्रकाली तलावडी परिसरात टवाळखोर, गावगुंडांची दहशत

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : भद्रकाली जुने टॅक्सी स्टँड आणि तलावडी परिसरात टवाळखोर आणि गावगुंडांनी प्रचंड दहशत माजवली आहे. रहिवाशांसह खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे.

मद्याच्या नशेत लूट करून मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी वेळीच आवर घालावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. (Bhadrakali Talavadi area terror of thugs village goons nashik Latest Crime News)

जुने नाशिकमधील भद्रकाली टॅक्सी स्टँड परिसरासह तलावाडी, कापड बाजारात नागरिक खरेदीसह विविध कामानिमित्त येत असतात. स्थानिक आणि शहराच्या विविध भागातून येणारे गुंड आणि टवाळखोर नागरिकांना अडवून त्यांना मारहाण करतात.

त्यांच्या खिशातील रक्कम लंपास करणे, महिलांचे मोबाईल, पर्स चोरून नेतात. विशेषत: पुरुषांना मारहाण करून लूट करतात. दोन दिवसांपूर्वी लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणास काही टवाळखोरांनी रस्त्यावर बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील पैसे काढून घेतले होते. शिवाय रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल लंपास करतात. याचा स्थानिकांना प्रचंड त्रास होत आहे.

तलावडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. अश्लील चित्रपट दाखविणारे व्हिडिओ हॉल, गांजा, भांग विक्रीसह अवैध धंद्ये सुरू आहेत. देहविक्रीचा व्यवसायही येथील जुन्या विविध लॉजमध्ये सुरू असतो.

देहविक्री करणाऱ्या महिला याच रस्त्यावर बाजारपेठेत उभे राहून चकरा मारून ग्राहकांना आकर्षित करतात. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या महिलांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलत असतो.

खरेदीसाठी आलेल्या महिलांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. बाजारपेठेतील व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. भद्रकाली पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या महिलांसह टवाळखोरांवर कारवाई केल्यास अशा घटनांना आळा बसण्यास मदत होईल, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह व्यावसायिकांनी केली आहे.

"महापालिकेच्या माध्यमातून याठिकाणी सेंटर मार्केट उभारले जात आहे. अनेकांना रोजगार मिळणार आहे. मात्र, अशा घटनांमुळे याठिकाणी व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अशा घटनांना आळा घालावा."

-चेतन शेलार, संस्थापक अध्यक्ष, छत्रपती सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Magic Ritual: महाराष्ट्र हादरला! सोळा वर्षीय मुलीवर अघोरीकृत्य, वर्षभरापासून सुरू होता प्रकार! शेवपेटीत झोपवायचा अन्...

Latest Maharashtra News Updates : 'मोर्चा निघणार म्हणजे निघणार..'; अविनाश जाधवांच्या अटकेनंतर संदीप देशपांडेंचा इशारा

Vidarbha Rain: विठ्ठल पावला... विदर्भात पावसाची संततधार; यवतमाळात नदी नाल्यांना पूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, सर्वत्र पावसाचा संचा

Hinjawadi IT Park : हिंजवडीमधील समस्यांचा मुख्यमंत्री घेणार आढावा; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Basmat Crime: विदर्भातील तरुणीवर प्रेमाच्या नावाखाली अत्याचार; वसमतमधील आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT