Fraud Crime Latest Marath News esakal
नाशिक

भऊर घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल; दीड कोटीची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा (जि. नाशिक) : भऊर येथील महाराष्ट्र बँकेत (Bank of Maharashtra) रोजंदारीवर कार्यरत असताना पदाचा गैरफायदा घेऊन सुमारे एक कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रुपयांचा अपहार (Fraud) केल्याप्रकरणी संशयित भगवान ज्ञानदेव आहेर (रा. लोहोणेर, ता. देवळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. संशयित फरारी असून, देवळा पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (Bhaur scam case filed One half crore fraud Nashik Latest Crime News)

भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत भगवान ज्ञानदेव आहेर (रा. लोहोणेर) २०१६ पासून ८ जुलै २०२२ पर्यंत रोजंदारीवर कार्यरत होता.

त्याने पदाचा गैरफायदा घेऊन ठेवीदार, खातेदारांचा विश्‍वास संपादन करून बँकेतील जवळपास ३२ खातेधारकांच्या खात्यावरील पीक कर्जाची रक्कम घेऊन बँकेचा सही शिक्का असलेल्या स्वतः हस्तलिखित पेनाने लिहिलेल्या मुदत ठेवीच्या पावत्या बनावट तयार करून त्या ठेवीदारांना त्यांच्याकडील रक्कम स्वीकारून अदा केल्या.

ही रक्कम बँकेत जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जवळपास एक कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रुपयांची रक्कम स्वतःजवळ बाळगून अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी मालेगाव येथील बँकेचे क्षत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी देवळा पोलिसांत फिर्याद दाखल केली. संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. आर. देवरे तपास करीत आहेत.

सहकारी बँक, पतसंस्थेत आर्थिक घोळ झाल्याचे व पैसे बुडाल्याचे चित्र नागरिकांनी बघितले आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकेत अशाप्रकारे अपहार होत असेल, तर नागरिकांनी विश्‍वास कोणावर ठेवावा, अशी प्रतिक्रिया सभासद, खातेदारांमधून उमटत आहे.

"ग्रामीण भागात काबाडकष्ट करून, पोटाला चिमटी देत खातेदार आपली पुंजी बँकेत ठेवतात. त्यालाही सुरक्षितता नाही. महाराष्ट्र बँकेतून माझ्या कर्ज खात्यातून चार लाख आठ हजार ६४० रुपये परस्पर काढले असून, अफरातफर झालेली रक्कम संबंधित खातेदारांना तत्काळ मिळावी." - बाळू शेवाळे, खातेदार, खामखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT