baban gholap And Chhagan Bhujbal  esakal
नाशिक

Chhagan Bhujbal News : बबन घोलप 1991 च्या फुटीराच्या यादीत : भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal News : शिवसेनेतून १९९१ ला जे फुटले त्या यादीत माजी मंत्री बबनराव घोलप यांचेही नाव वरच्या क्रमांकावर होते. त्यामुळे घोलप यांनी निष्ठेविषयी बोलू नये, अशी टीका अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केली.

भुजबळ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. भुजबळ वर्षापूर्वीच शिवसेनेत प्रवेश करणार होते मात्र दिल्लीतून मुंबईला येऊन त्यांचा शिवसेना प्रवेश रोखला, असा दावा घोलप यांनी केला होता. (Bhujbal statement about Baban Gholap in 1991 partition list nashik news)

त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, मी आणि माझी मूल आम्ही कधीही आम्हाला शिवसेनेत प्रवेश करायचा आहे.

असे कुणालाही म्हटलेल नाही. कुणाकडे आम्ही गेलोही नाही. मधले कार्यकर्ते चर्चा करीत असतील तर मला माहीत नाही. कारण नसतांना घोलप यांनी विषय काढला आहे. त्यांना शिवसेना सोडून जायचे आहे, त्यांनी जावं.

पण इतरांना निष्ठेची भाषा शिकवू नये. १९९१ ला शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाण्यासाठी ज्या शिवसेनेच्या ३६ आमदारांच्या सह्या केल्या होत्या त्यात सगळ्यात वर बबन घोलप यांची सही होती. त्यामुळे बबन घोलप यांनी निष्ठेची भाषा करू नये, असा टोमणा मारला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्वतंत्र आरक्षण द्या

आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाविषयी ते म्हणाले की, आंदोलन आणि आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही, उलट अडचणी निर्माण होतील, चर्चने प्रश्न सुटतील, चर्चेसाठी सरकार तयार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलन थांबवून चर्चेला सुरवात करावी. सण उत्सव आनंदने साजरा करावेत.

इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला कुणाचाही विरोध नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी योग्य आहे, आम्ही सगळे तेच बोलतो आहोत, असेही सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Oppo New Mobile : ओप्पोचा ब्रँड मोबाईल भारतात लॉन्च! पण Oppo Find X9 5G की OnePlus 15 5G..कोणता आहे बेस्ट? पाहा संपूर्ण Review

Viral Video: मलायका अरोराचा हटके स्टंट! स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवला गॅस, अन् बनवला चहा, व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT