grampanchayt elections.jpg 
नाशिक

बिहार निवडणूक निकालाचा सातपूरमध्ये फीव्हर! अनेकांनी बदलल्या नोकरीच्या पाळ्या

सतीश निकुंभ

सातपूर (नाशिक) : बिहार विधानसभेच्या निवडणूक निकालाचा सातपूर औद्योगिक वसाहतीत फीव्हर पाहायला मिळाला. दोन दिवसांपासून निकालाच्या परिणामांचे पडसाद येथे दिसत आहेत. सातपूर-अंबड परिसरात गावाकडील निकालानंतर कुठे आनंद उत्साह, तर कुठे नैराश्याचे दर्शन घडले. 

कुठे आनंद उत्साह, तर कुठे नैराश्याचे दर्शन

बिहार निवडणुकीच्या निकालामुळे दोन दिवसांपासून हिंदी भाषिकांचे लक्ष गावाकडील निकालाकडे असल्याचे पाहायला मिळाले. हे हिंदी भाषिक मंगळवारी (ता. १०) दिवसभर टीव्हीसमोर बसले होते. त्यातील अनेकांनी नोकरीच्या पाळ्या बदलून घेत घरी निवडणुकीचा निकाल पाहिला. 
गावाकडे नातेवाईक निवडणुकीत आहेत, अशांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले.

अनेकांचा पार्टी करून निकालाचा आनंद

सातपूर, अंबड, श्रमिकनगर, राधाकृष्णनगर, विश्वासनगर, नागरे चौक, सातपूर-अंबड लिंक रोड, भंगार बाजार, दत्तनगर, म्हाडा कॉलनी, जाधव संकुल, कामगारनगर, सीपी टूल झोपडपट्टी, संतोषी मातानगर, सातपूर राजवाडा, स्वारबाबानगर तसेच औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात उत्तरप्रदेश व बिहार राज्यातील हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणावर राहतात. जसजसे निकाल येऊ लागले, तसतसा एकमेकांचा आनंद बहरत होता. त्यात अनेकांनी एकमेकांशी पार्टी व पैंजा लावल्या होत्या, तर काही जण समर्थक पक्षाचे आमदार जिंकल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत होते, तर काही मोठ्याने घरातच घोषणा देतानाही पाहायला मिळाले. सायंकाळी संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी पार्टी करून निकालाचा आनंद घेतला. 

माझे सर्व कुटुंब या निवडणुकीसाठी गावी आहे. त्यांच्याकडून राजकीय निवडणुकीबाबत अनेक गोष्टी ऐकायला मिळत होत्या. मंगळवारच्या निकालात नितीशकुमार पुन्हा विजयी झाले; पण तेजस्वी यादव यांनी तरुणामध्ये वेगळी ओळख निर्माण केली. यामुळे भविष्यात बिहारमध्ये रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, हीच अपेक्षा. - अमर मोर्या, बिहारी नागरिक  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway : विकेंडला ३०० लोकल रद्द! पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, वाचा कधी आणि का?

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उत्साह शिगेला! दोन दिवसांत तब्बल १०४६ अर्जांची विक्री, प्रत्यक्ष दाखल फक्त तीन

आलिया, अनन्या पेक्षाही जास्त मानधन घेते श्रद्धा कपूर; मुलीबद्दल शक्ती कपूर बोलले ते खरं आहे का? हे आहे सत्य

TET Result 2025 : टीईटी निकालाची तारीख ठरली? उत्तरसूचीवर हरकतीसाठी शेवटची संधी; साडेतीन लाख उमेदवारांची प्रतीक्षा संपणार

Morning Skincare Routine Tips: सकाळी सगळ्यात आधी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायचं की मॉइश्चरायझर? जाणून घ्या स्किनकेअर रूटीन टिप्स

SCROLL FOR NEXT