newborn baby.jpg 
नाशिक

घरी नव्या पाहुण्याची तयारी सुरु होती...अन् अचानक असा कोसळला दु:खाचा डोंगर की..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रसूतीदरम्यान मृत बालक जन्मास आल्याच्या कारणातून महिलेच्या कुटुंबीयांनी गोंधळ घातल्याचा प्रकार शनिवारी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात घडला. कर्मचारी आणि डॉक्‍टरांच्या हलगर्जीमुळे मृत बालक जन्मास आल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. 

मातेचा व कुटुंबिंयांचा रुग्णालयातच ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश...

बजरंगवाडी येथील माया पवार (वय 30) यांना प्रसूतीसाठी शुक्रवारी (ता. 24) सकाळी कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल केले. शनिवारी (ता. 25) रात्री दहाच्या सुमारास त्यांची प्रसूती झाली. प्रसूतीदरम्यान पुरुष जातीचे मृत बालक जन्मास आले. बालकाच्या मृत्यूची माहिती समजताच पवार कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे बाळ जन्मापूर्वीच दगावल्याचा आरोप केला. कर्मचाऱ्यांना किरकोळ मारहाणही केली. रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करत कुटुंबीयांची समजूत काढली. त्यात डॉक्‍टर किंवा कर्मचाऱ्यांचा दोष नसल्याचे सांगितले. पवार कुटुंबीयांनी महिलेची सोनोग्राफी केली नसल्याची माहिती समोर आली. सोनोग्राफी झाली असती तर बाळाच्या वाढीसंबंधित माहिती मिळू शकली असती, अशी माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांची समजूत काढत वाद मिटविला. भद्रकाली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

Gas Cylinder Shortage : कुंपणच शेत खातेय! हॉटेल सुरू, पण घरगुती गॅस टंचाई; नागरिकांचा संताप टोकाला, बुकिंग करूनही प्रतीक्षा

Food Poisioning : शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना विषबाधा; सर्व विद्यार्थिनीं धोक्याबाहेर

SCROLL FOR NEXT