नाशिक : (सटाणा) कोरोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन सुरू असून सर्व व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. राज्य असे कठीण काळात असताना सरकारच्या मदतीसाठी बरेच मदतीचे हात समोर आले. कोरोना विरुद्ध लढाईत खारीचा वाटा उचलत येथील १५ वर्षीय रेवश्री (श्रेया) सोनवणे या मुलीने वाढदिवसासाठी साठवलेले पाच हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
वाढदिवसाचे पैसे कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी...
राष्ट्रवादी कोंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांची कन्या रेवश्री (श्रेया) सोनवणे हिला खर्चाला दिलेले पैसे साठवायचा छंद जडला आहे. येत्या जून महिन्यात तिचा वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी तिने गेल्या वर्षभरापासून हळूहळू आपल्या पिगीबँक मध्ये रक्कम जमा केली होती. मात्र देशासह राज्यावर सध्या कोरोनाचे संकट ओढवले असल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे चित्र रेवश्रीने बातम्यांमधून बघितले. तिने वडिलांकडे हट्ट धरला की, माझा वाढदिवस न करता वाढदिवसासाठी जमा केलेले पैसे कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी द्यावा. लेकीचा हट्ट पुरविण्यासाठी राजेंद्र सोनवणे यांनी येथील कॉर्पोरेशन बँकेत जाऊन पाच हजार रूपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोविड-१९ या शिर्षाखाली बँक ऑफ इंडिया मुंबई मुख्य शाखेत जमा केला.
यापुढे येणाऱ्या प्रत्येक सणासुदीत समाजातील दिनदुबळ्यांना यथाशक्ती मदत करणार असल्याचा संकल्प रेवश्रीने केला आहे. सर्व समाजघटकांनी अशा भयावह संकटात गोरगरीब माय बापांसाठी मदत करावी असे आवाहनही रेवश्रीने केले आहे. तिच्या या संवेदनशीलतेचे समाजातील विविध मान्यवरांकडून कौतुक होत आहे.
हेही वाचा > 'तुमचा कुत्रा माझ्या मुलाच्या अंगावर धावून गेला'...म्हणून 'ते' समजवायला गेले...तर चक्क त्यांनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.