bjp are not happy with uday samant announcement of it hub in akrale nashik news esakal
नाशिक

Nashik Uday Samant : उद्योगमंत्र्यांचा ‘द्राविडी प्राणायाम’; भाजपमध्ये नाराजी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Uday Samant : दिंडोरी तालुक्यातील अक्राळे एमआयडीसीलगत शंभर एकर जागा आयटी पार्कसाठी आरक्षित करण्याच्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या घोषणेवरून भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

महापालिका हद्दीमध्ये सत्ताकाळात शंभर एकर जागा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अक्राळे येथील जागा सुचविण्यात आल्याने ही नाराजी आहे. महापालिका हद्दीत सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा आहे. (bjp are not happy with uday samant announcement of it hub in akrale nashik news)

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच रोजगाराची चांगली निर्मिती होईल, असे असताना केंद्रीय लघुउद्योगमंत्र्यांनीदेखील प्रस्ताव आल्यास शंभर कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले असताना राज्याच्या उद्योगमंत्र्यांचा आयटी पार्कचा ‘द्राविडी प्राणायाम’ कशाला, असा सवाल करण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना रोजगाराचे गिफ्ट देण्याच्या उद्देशाने तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयटी पार्कची संकल्पना मांडली. उत्तर महाराष्ट्रातील छोटे आयटी पार्कचे युनिट एकाच जागेत स्थापन करण्याबरोबरच मुंबई, बंगळूर, कोलकता, चेन्नई, पुणे, हैदराबाद शहरांमधील आयटी कंपन्यांना नाशिकमध्ये निमंत्रित करून काही प्रमाणात गुंतवणूक करण्याचा उद्देश होता.

त्यासाठी आयटी कोन्क्लेव्हदेखील भरविला. केंद्रीय लघुउद्योगमंत्री नारायण राणे यांनी महापालिकेने प्रस्ताव पाठविल्यास तातडीने मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. परंतु प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर आयटी पार्क प्रकल्प लालफितीत अडकला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेत आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर विकासकामे दाखविण्याची स्पर्धा सुरू झाली. त्याचाच एक भाग म्हणून एका स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरून उद्योगमंत्री सामंत यांनी अक्राळे एमआयडीसीत शंभर एकर जागेत आयटी पार्कची घोषणा केली. घोषणा प्रत्यक्षात अमलात येईल की नाही, याबाबत साशंकता असली तरी प्रत्यक्षात भाजपला ही बाब जिव्हारी लागली.

महापालिकेत सत्ता असताना आडगाव शिवारात शंभर एकर जागेत आयटी पार्क स्थापन करण्याचा ठराव संमत करण्यात आला. भाडेतत्त्वावर जागा, आयटी कंपन्यांसाठी महत्त्वाची ठरणारी जवळ असलेली विमानसेवा, महामार्गापासून शंभर मीटर अंतर, तर मेडिकल कॉलेज व रुग्णालय या पार्श्वभूमीवर यापेक्षा योग्य जागा नाही. असे असताना याकडे दुर्लक्ष करून अक्राळे येथील जागेच्या आग्रह का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

आमदारांचाही पाठपुरावा

आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून आडगाव शिवारातील जवळपास साडेतीनशे एकर जागेवर आयटी पार्क उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे कार्यसन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून तातडीने सविस्तर प्रकल्प अहवाल मागितला. ही बाबदेखील उद्योगमंत्र्यांकडून दुर्लक्षित करण्यात आली.

"पायाभूत सुविधांसह मुख्य सेवा उपलब्ध असल्याने महापालिका हद्दीत आयटी पार्क प्रस्तावित केला. याच आयटी पार्कला चालना देणे गरजेचे आहे. महापालिकेने प्रस्ताव सादर केल्यास केंद्र सरकारची शंभर कोटी रुपये देण्याची तयारी आहे. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच रोजगाराला चालना मिळेल." - सतीश कुलकर्णी, माजी महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: इशान किशनची बॅट तळपली, ठोकलं पहिलं शतक; कर्णधार सूर्याचीही फिफ्टी; भारताच्या २७० धावा पार...

Pune Traffic: पुण्यातील ७५ किलोमीटरच्या रस्त्यांवर गतिरोधक बसवणार; वाहतुकीच्या दृष्टीने मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update: सामाजिक जाणिवेशिवाय अभियांत्रिकी अपूर्ण - आयुक्त नवलकिशोर राम

Crime: धक्कादायक! आठवीतील मुलगी गर्भवती राहिली; वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना माहितीच नाही, नंतर... जे घडलं त्यानं सगळेच हादरले

IND vs NZ, 5th T20I: संजू सॅमसनने शेवटची संधीही गमावली, घरच्या मैदानातही स्वस्तात आऊट

SCROLL FOR NEXT