bjp watching ekanath khadse supporter mlas in nashik marathi news 
नाशिक

नाशिकमध्ये खडसे समर्थक आमदार नजरकैदेत? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

विक्रांत मते

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान भाजप मध्ये अद्याप कुठली प्रतिक्रिया उमटली नाही व स्वतः खडसे यांनी देखील या चर्चेला अर्थ नसल्याचे सांगितले आहे. तरी खडसे यांच्या बरोबर बारा ते पंधरा आमदार जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागल्याने त्यापार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील काही आमदारांवर भाजप कडून ‘वॉच' ठेवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. खडसेंनी पक्ष सोडला तरी त्यांच्यासोबर एकही आमदाराने जावू नये यासाठी फिल्डींग लावली जात असल्याचे बोलले जात आहे. 

राज्यात भाजपची सत्ता असताना एकनाथ खडसे यांच्याकडे मंत्रीमंडळातील दुसया क्रमांकाचे महसुल मंत्री पद होती त्याचबरोबर अन्य खाती त्यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री झाले नसले तरी प्रबळ मंत्री म्हणून त्यांचे ते समोर आले होते परंतू कालांतराने भोसरी भुखंड व्यवहाराच्या निमित्ताने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. खडसे यांना भाजप मधून धक्का देण्याचे तंत्र एवढ्यावरचं थांबले नाही. विधानपरिषद, विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचे धक्के बसले. जळगाव मधील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील त्यांची पकड ढीली करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न झाल्याचे खुद्द खडसे यांनी अनेकदा सांगितले. राज्य पातळीवर देखील संघटनेत त्यांना स्थान दिले नाही. त्यामुळे दर दोन, चार महिन्यांनी खडसे नाराजी व्यक्त करत राहीले. मध्यंतरीच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांनी लक्ष केल्यानंतर खडसे आता पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु झाली.

जयंत पाटील-खडसे भेट

दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे जळगाव येथे खडसे यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतू जळगाव एवजी बुधवारी मुंबईतचं त्यांनी बैठक घेतली. बैठकीच्या निमित्ताने खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्‍चित झाल्याची चर्चा सुरु झाली. परंतू खडसेंनी त्याला नकार दिला आहे. 

फार्म हाऊस भेटीनंतर आमदार नजरकैदेत?

खडसे भाजपला रामराम ठोकणार व सोबत भाजपचे बारा ते पंधरा आमदार सुध्दा त्यांच्यासोबत जाणार असल्याची देखील चर्चा आहे. त्या अनुशंगाने खडसे यांच्याबरोबर कोण जाणार याबाबत तर्कवितर्क लावताना नाशिक मध्ये खडसे समर्थक आमदार कोण? याचा शोध घेतला जात आहे. आमदारांवर कार्यकर्त्यांकडून छुप्या पध्दतीने नजर ठेवली जात असून हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना प्रादुर्भावापुर्वी शहरातील भाजपच्या एका आमदाराने खडसे यांच्या मुक्ताई नगर येथील फार्म हाऊसवर भेट घेतली होती त्यासंदर्भातून आमदारांच्या नजरकैदेचा मुद्दा समोर आला आहे. 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT