couple's blood donation.jpg
couple's blood donation.jpg 
नाशिक

आगळावेगळा विवाहसोहळा...बघून सगळे झाले अवाक..

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सिडको) औरंगाबाद येथील समाजसेवक सुमित पंडित यांच्या आदर्श प्रस्तावातून नवोदित वर चि. कल्पेश वधू कु.धनश्री यांचा विवाह नाशिक येथील लक्ष्मी धवल समाज मंगल कार्यालयात पार पडला. लग्न म्हटले की, हौसमौस आलीच परंतू यासाठी नवोदित वर चि. कल्पेश वधू कु.धनश्री अपवाद ठरले आहे. विवाह सोहळ्या प्रसंगी सर्व श्रेष्ठ दान रक्तदान शिबिराचे आयोजन करुन त्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.


आदर्श पायंडा घालणाऱ्या दोन्ही कुटुंबियांविषयी लग्नसोहळ्यात विशेष चर्चा

या विवाह सोहळ्याप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वरमाळा टाकण्याअगोदर नवोदित दाम्पत्यांनी रक्तदान केले. शिबिरास प्रारंभ नाशिक येथील गुन्हे शाखेचे एपीआय अभिजीत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. एपीआय यांनी रक्तदाता म्हणून रक्तदान केले. वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या वरिष्ठ मंडळी, तरूण समाज बांधव आदि यांचेही यात रक्तदान झाले. रक्तदात्यांमध्ये माणुसकी ग्रुपचे संस्थापक सुमित पंडित, गजानन क्षीरसागर,योगेश राऊत,प्रशांत म्हस्के, शुभम आव्हाड,रुपेश बडगुजर, राजेंद्र पंडित, शिवनारायन वैद्य,अभिजित सोनवणे,नंदू व्यवहारे,गोपाल मालकर आदींचा समावेश असून यात एकूण २१ दात्यानी रक्तदान केले. या आदर्श पायंडा घालणाऱ्या दोन्ही कुटुंबियांविषयी लग्नसोहळ्यात विशेष चर्चा होती. 

एकूण २१ दात्यानी रक्तदान 

रक्तसंकलन कामी जे.डी. सी.बिटको हॉस्पिटल रक्तपेढीचे डॉ. जितेंद्र धनेश्वर,श्रीमती वर्षा माळवे,सिमा जोशी, सुजाता जेजुरकर,श्री.सुधाकर हंडोरकर,सुनील सोनवणे,संकेत बोराडे,धनराज काळेवार,विठ्ठल गायकवाड, रिजवान सौदागर,कर्मचाऱ्यांनी काम केले. याप्रसंगी  ज्ञानेश्वर राजपुत,देविदास पंडित,दिगंबर कानडे,शामराव पंडित, मिराबाई पंडित, पुजा पंडित,माणुसकी ग्रुपच्या आदी सदस्यांनी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT