Fake Medical Certificate case
Fake Medical Certificate case esakal
नाशिक

Bogus Medical Certificate Case : डॉ. श्रीवास यांना अंतरिम जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हा रुग्णालयाचे माजी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. ग्रामीण पोलिसांना १४ नोव्हेंबरपर्यंत डॉ. श्रीवास यांना अटक करता येणार असून, डॉ. श्रीवास व डॉ. निखिल सैंदाणे यांच्या जामीन अर्जावर १४ तारखेलाच सुनावणी होणार आहे. (Bogus Medical Certificate Case Dr Srinivas granted interim bail Nashik Crime News)

पोलिस कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, डॉ. निखिल सैंदाणे यांचे अटक पूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळले.

त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डॉ. सैंदाणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. डॉ. श्रीवास यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यांच्या अर्जावरही १४ तारखेलाच सुनावणी होणार आहे. तोपर्यंत ग्रामीण पोलिसांना डॉ. श्रीवास यांना अटक करता येणार नाही.

बृहन्मुंबई, पालघर आणि जळगाव येथील २१ पोलिसांनी आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केल्याचे समोर आल्यानंतर त्यासंदर्भात गुन्हा दाखल होऊन तपास सुरू आहे.

यात अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह जिल्हा रुग्णालयात लिफ्टमन, खासगी डॉक्टर व त्याचा सहकाऱ्यास अटक करण्यात आली. डॉ. श्रीवास हे मंगळवारी (ता. १) जिल्हा शासकीय रुग्णालयात येत अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, त्यांना अंतरिम जामीन असल्याने ते सेवेत रुजू होऊ शकत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update: पाकिस्तानचे झेंडे चालतील का? याचा बदला तुम्ही वीस तारखेला घ्या- एकनाथ शिंदे

Covaxin: कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर; वाचा नव्या अभ्यासात काय काय आढळले

IPL Playoffs : IPL प्लेऑफ समीकरण, 2 जागीसाठी 5 संघ भिडणार, जाणून घ्या कोणाचा रस्ता आहे सोपा?

Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT