mathefiru ozar.jpg
mathefiru ozar.jpg 
नाशिक

''तिच्या आईवडिलांनी आमच्या लग्नाला परवानगी नाकरली.. म्हणूनच मी तिच्यासोबत.. ''..माथेफिरू युवकाची धक्कादायक जबानी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / ओझर : एका मुलीवर तो प्रेम करायचा. त्याने तिच्या आई वडीलांकडे लग्नाची मागणीही घातली. परंतु त्यांनी लग्नासाठी संमती दिली नाही. त्याचा राग दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर रागाच्या भरातच तो निघाला. त्यावेळी मुलगी तिच्या आई वडीलांसोबत मजूरीसाठी मळयात गेले होते. तेव्हाच घडला अंगावर काटा आणणारा प्रकार...

असा घडला प्रकार
संशयित सागर प्रभाकर गायकवाड हा अनेक दिवसांपासून शिलेदार वाडीतील एका मुलीवर प्रेम करायचा. त्याने तिच्या आई वडीलांकडे लग्नाची मागणीही घातली. परंतु त्यांनी लग्नासाठी संमती दिली नाही. त्याचा राग दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर रागाच्या भरातच तो निघाला. त्यावेळी मुलगी तिच्या आई वडीलांसोबत मजूरीसाठी यांच्या मळयात गेले होते. सायंकाळी (ता.२६) सहा वाजता कामावरून सुट्टी झाल्याने ती पुढे व आई वडील मागे थोडया अंतराने निघाले. सागर गायकवाडने ती एकटी असल्याचा डाव साधून गंगापूरच्या कालव्यालगत बागेजवळ तिला गाठले  व काही कळायच्या आत धारदार शस्त्राने तिच्या पोटात व पाठीवर वार केले ती खाली पडली असता ती मृत झाली अशी समज झाल्याने तेथून पळ काढून थेट पोलीस ठाणे गाठून त्याने संबंधीत प्रकार कथन केला.व जबानी दिली..

मुलीला गंभीर जखम

दरम्यान पाठीमागून येणाऱ्या मुलीच्या आई वडीलांनी जखमी अवस्थेतील मुलीला पाहून आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी मदत करून तिला प्राथमिक उपचारासाठी सायखेडा फाट्यावरील साई हॉस्पिटलला आणण्यात आले. मात्र जखम मोठी व गंभीर असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती ओझर पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर जखमी मुलीची चौकशी करण्यात आली.

माथेफिरू संशयितावर गुन्हा दाखल

अनेक दिवसांपासून खोल्या वहाळातील एक मुलगा शिलेदार वाडी येथील मुलीवर प्रेम करायचा त्याने तिच्याकडे लग्नासाठी मागणीही घातली परंतू मुलीचे आई  वडील संमती देत नसल्याचा राग मनात धरून काल दि २६ रोजी सायंकाळी ती कामावरून घरी येतांना दिला गाठून तिच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी सागर गायकवाड यास अटक करण्यात आली असून पिंपळगांव बसवंत न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी त्याला चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. घटनेबाबत ओझर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०७ व ५०६नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक ग्रामीणच्या उपविभागिय अधिकारी अरूंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि भगवान मथुरे,पोलीस उपनिरिक्षक अजय कवडे, विजय गायकवाड अंबादास गायकवाड, आहेर खांडवे धारबळे पानसरे पवार दाभाडे होमगार्ड पठाण ह करीत आहेत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT