green coridor 123.jpg 
नाशिक

मेंदुमृत सुनंदा फरताळेंच्‍या रूपाने अत्‍यावस्‍थ रुग्‍णांना जीवदान! सामाजिक जाणिवेचा आदर्श

अरुण मलाणी

नाशिक : येथील सुनंदा फरताळे (वय ६२) यांच्‍या मेंदूत झालेल्‍या रक्तस्त्रावामुळे त्‍यांच्‍यावर खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू होते. डॉक्‍टरांनी त्‍यांना तपासत मेंदूमृत घोषित केले. वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्‍या फरताळे कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेत समाजासमोर सामाजिक जाणिवेचा आदर्श ठेवला. त्‍यानुसार यकृत नाशिकच्‍या सह्याद्री रुग्‍णालयात प्रत्‍यारोपणासाठी नेण्यात आले. तर डोळे व त्वचा दान केल्याने अत्‍यावस्‍थ रुग्‍णांना जीवदान मिळाले आहे. 

अत्‍यावस्‍थ रुग्‍णांना जीवदान 
दिवंगत सुनंदा फरताळे या आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या आत्या होत. तर डॉ. दत्तात्रय फरताळे यांच्‍यासह मुलगी डॉ. सोनिया फरताळे, मुलगा डॉ. वैभव फरताळे व सून डॉ. रचना फरताळे असे कुटुंबातील सदस्‍य वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहेत. दरम्‍यान, शनिवारी (ता.९) सुनंदा फरताळे यांच्‍या मेंदूत रक्‍तस्‍त्राव झाल्‍याने त्‍यांना खासगी रुग्‍णालयात दाखल केले होते. तेथे डॉ. मुकेश धांडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. दरम्‍यान, उपचाराला प्रतिसाद मिळत नव्‍हता.

अवयवदानातून डॉक्‍टर कुटुंबाचा आदर्श, यकृताचे नाशिकला प्रत्‍यारोपण 

समुपदेशक डॉ. संजय रकिबे व डॉ. भाऊसाहेब मोरे यांच्‍याशी चर्चा व समुपदेशनानंतर सौ. फरताळे यांना हृषीकेश हॉस्‍पिटल येथे हलविले. येथे समितीने तपासून मेंदूमृत घोषित केल्यानंतर रुग्णाचे शक्य ते सर्व अवयवदान करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. त्‍यानुसार झेडटीसीसी, पुणे यांना कळविल्‍यानंतर यकृत नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे गरजू रुग्णास देण्यात आले. डोळे सुशील आय हॉस्‍पिटलला, तर त्‍वचा डॉ. नेहेते यांच्‍या वेदांत त्‍वचा बँकेत देण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT