नाशिक : ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून काही देशांची आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. परिणामी टपाल विभागाकडून रशिया आणि इंग्लंडची टपाल पार्सलसेवा थांबविण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनचा परिणाम; महसूल बुडणार
मार्चमध्ये जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेक देशांनी त्यांची आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली होती. संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेनमुळे पुन्हा तीच परिस्थिती उद्भवली आहे. केंद्र सरकारने रशिया आणि इंग्लंडची आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याचा परिणाम केवळ प्रवासी वाहतुकीवरच झाला असे नाही, तर सर्व प्रकारच्या आयात-निर्यातीवरही झाली आहे.
आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेची बुकिंग बंद
बुधवारी (ता.२३) टपाल विभागाच्या केंद्रीय कार्यालयाकडून रशिया आणि इंग्लंड दोन्ही देशांची पार्सल बुकिंग त्वरित थांबविण्याच्या सूचनाचे पत्रक मुख्य टपाल कार्यालयास ई-मेलद्वारे प्राप्त झाले आहे. लगेचच मुख्य टपाल कार्यालयासह उपविभागीय टपाल कार्यालयाकडून रशिया आणि इंग्लंडची आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेची बुकिंग बंद केली आहे. त्यामुळे या देशाची टपाल विभागाची पार्सलसेवा कोलमडली आहे. टपाल विभागास पार्सलच्या बुकिंगच्या माध्यमातून मिळणारा महसूल बुडण्याची शक्यता आहे.
वर्षात दुसऱ्यादा सेवा बंद
एप्रिलमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने टपाल विभागाकडून पार्सलसेवा थांबविण्यात आली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये नवीन विषाणू आढळल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने टपाल विभागानेही इंग्लड, रशियाची टपाल पार्सलसेवा थांबविण्याची वर्षभरातील ही दुसरी वेळ आहे.
आंतरराष्ट्रीय विमानसेवा सरकारकडून बंद करण्यात आल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून रशिया, इंग्लडची पार्सल बुकिंग थांबविण्याच्या सूचनेनुसार सध्या या देशाचे पार्सल बुकिंग केले जात नाही. - एस. आर. जाधव, वरिष्ठ पोस्टमास्तर, जीपीओ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.