Sunita Dhangar Bribe Case esakal
नाशिक

Sunita Dhangar Bribe Case: सुनीता धनगरविरोधात अपसंपदेचा गुन्हा; ज्ञात स्रोतापेक्षा 64.87 टक्के जादा संपत्ती

सकाळ वृत्तसेवा

Sunita Dhangar Bribe Case : गेल्या जूनमध्ये ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेल्या महापालिकेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनगर यांच्याकडे ज्ञात स्रोतापेक्षा अधिक ९६ लाख ४३ हजार ८०९ रुपयांची अपसंपदा जमा असल्याचे आढळून आले. (Bribe case against Sunita Dhangar 64 percent more wealth than known sources nashik crime)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २ जूनला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. पथकाला त्यांच्या घरझडतीत ८५ लाखांची रोकड व ३२ तोळे सोन्याचे दागिने आढळून आले होते.

यासह आडगाव शिवारात मोकळा भूखंड आणि शहरात आणखी दोन महागडे फ्लॅट धनगर यांच्या नावे असल्याचे उघडकीस आले होते. विभागाने केलेल्या उघड चौकशीत धनगर यांनी ज्ञात स्रोतापेक्षा ६४.८७ टक्के जादा संपत्ती गोळा केल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे पथकाने अंबड पोलिस ठाण्यात धनगर यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धनगर यांच्या मालमत्तेची उघड चौकशी केली.

या चौकशीत त्या १५ जून २०१० ते ३ जून २०२३ या कालावधीत शासकीय सेवेत लोकसेवक म्हणून कार्यरत होत्या. या कालावधीत त्यांनी त्यांच्या कायदेशीर ज्ञात स्रोतापेक्षा अधिक ९६ लाख ४३ हजार ८०९ रुपयांची अपसंपदा जमा केल्याचे आढळून आले.

त्यामुळे धनगर यांच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३ (१) (ब )/१३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

SCROLL FOR NEXT