bribe 123.jpg
bribe 123.jpg 
नाशिक

घराला वडिलांचे नाव लावण्यासाठी लाच मागणे पडले महागात; परिरक्षक भूमापक अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : खरेदी केलेल्या घराला वडिलांचे नाव लावण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारताना नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील परिरक्षक भूमापक अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. संदीप हरिलाल चव्हाण असे संशयित लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. 

घराला वडिलांचे नाव लावण्यासाठी मागितली लाच
तक्रारदारांनी खरेदी केलेल्या घराला वडिलांचे नाव लावण्यासाठी नाशिक शहरातील नगर भूमापन अधिकारी कार्यालय एकमधील संदीप चव्हाण यांच्याकडे संपर्क केला असता श्री. चव्हाण यांनी या कामासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ४० हजार रुपये ठरले. या प्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता विभागाने भूमापन कार्यालयात सापळा रचल्यानंतर गुरुवारी (ता. ३१) ३० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना विभागाने चव्हाण यांना रंगेहाथ पकडत अटक केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT