Brick prices have doubled since the lockdown nashik marathi news
Brick prices have doubled since the lockdown nashik marathi news 
नाशिक

घर बांधण्याचं स्वप्न महागलं! लॉकडाउनंतर विटांचा भाव चक्क दुप्पट

शरद भामरे

जुनी शेमळी (जि. नाशिक) : सुमारे आठ महिन्यांनंतर लॉकडाउन उठल्यावर बांधकामाला लागणाऱ्या विटांचा भाव आकारानुसार सात ते चौदा हजार रुपये असा दुप्पट झाला आहे. बांधकाम व्यवसाय जोमात सुरू असून, मजुरांअभावी बांधकाम करणे सामान्यांचे कंबरडे मोडणारे ठरणार आहे. 

व्यवसाय उशिरा सुरू झाल्याने टंचाई

लॉकडाउनच्या काळात बांधकाम ठप्प झाल्याने मजूर आपापल्या राज्यात गेले होते. अद्यापही काही मजूर आलेले नसल्याने स्थानिक ठिकाणी मजुरांना बांधकामासाठी एक हजार विटा पाडण्यासाठी ५६० रुपये भाव द्यावा लागत आहे. लॉकडाउनपूर्वी आधी लहान विटेला साडेचार हजार रुपये, मोठ्या विटेला नऊ हजार रुपये दर हजारी भाव होता. तर लॉकडाउननंतर अचानक भाव सात हजार, तर १४ हजारांपर्यंत म्हणजे दुप्पट झाला आहे. सध्या वीट मिळत नसल्याने व पाऊसही उशिरा चालल्यामुळे हा व्यवसाय उशिरा सुरू झाल्याने वीट उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही?

लहान वीट सात बाय चार, तर मोठी वीट नऊ बाय पाच असते. हा व्यवसाय चालविण्यासाठी व वीट बनविण्यासाठी दगडी कोळसा, लाकूड, बॉयलर, काळी माती, जाड माती, राख खडवण, घेसू, खोके, पाणी, ट्रॉली, वाहतूक आदींचे भाव वधारले असून, पाण्यासाठी महिन्याचा कालावधी लागतो, तर वीट भाजण्यासाठी महिन्याचा कालावधी लागतो. वीट पाडण्यापासून तर वीट रचण्यासाठी मजूर व लागणारे साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे ठेकेदारांना व सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. 

लॉकडाउननंतर विटांचा भाव दुप्पट झाला आहे. याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. मजूर मिळत नसल्याने व्यवसायावरही परिणाम होत आहे. या व्यवसायाला लागणारे भागभांडवल मोठे आहे. लॉकडाउनच्या आधी ज्या ठेकेदारांनी कमी दरात बांधकाम घेतले आहे, त्यांना वीट न परवडणारी झाली आहे. 
- प्रकाश कुंभार, व्यावसायिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT