sister and brother.jpg 
नाशिक

ह्रदयद्रावक! "माझ्या भावाला वाचवा हो..सर्व पोहचेपर्यंत बहिणीने तलावात उडी घेतली होती " अन् मग...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सुप्रिया ज्ञानेश्वर सांगळे (13) व अनुराग सांगळे (11) हे एकमेकांचे चुलत भावंड असून सकाळी कपडे धुण्यासाठी दोघेही घराजवळ असलेल्या पाझर तलावाकडे गेले होते. शिर्डी महामार्गाजवळ भोकण नाल्यावर हा पाझर तलाव आहे. सुप्रिया कपडे धुवत असताना अनुराग पाण्यात अतरला. मात्र, तेथे असलेल्या खोल खड्ड्यात अंदाज न आल्याने तो बुडाला...अन् मग जे काही झाले ते ह्रदयद्रावक होते.

असा घडला प्रकार

सुप्रिया ज्ञानेश्वर सांगळे व अनुराग सांगळे हे एकमेकांचे चुलत भावंड असून सकाळी कपडे धुण्यासाठी दोघेही घराजवळ असलेल्या पाझर तलावाकडे गेले होते. शिर्डी महामार्गाजवळ भोकण नाल्यावर हा पाझर तलाव आहे. सुप्रिया कपडे धुवत असताना अनुराग पाण्यात अतरला. मात्र, तेथे असलेल्या खोल खड्ड्यात अंदाज न आल्याने तो बुडाला. ते पाहून सुप्रियाने आरडाओरडा करून जवळच्या शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीला बोलावले. हे शेतकरी तिथे पोहचेपर्यंत बहिणीने देखील पाण्यात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने ती देखील पाण्यात बुडाली. मदतीला धावलेल्या शेतकऱ्यांनी दोघांचाही पाण्यात शोध घेतला.

तासाभरानंतर मृतदेह बाहेर काढले

सिन्नर तालुक्यातील भोकणी येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा तलावात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज (ता. 30) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडलीतलावात असलेल्या गाळात दोघेही फसल्याने सुमारे तासाभराने त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दोडी येथील रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर भोकणी येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भारत तुकाराम सांगळे यांनी या घटनेची माहिती वावी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT