NMC News esakal
नाशिक

NMC News: अंदाजपत्रकाची उडी अडीच हजार कोटी पार; लोकसभा निवडणूक आचारसंहिता पूर्वीच मंजुरीसाठी धावपळ

शहर विकासाची दिशा ठरविणाऱ्या आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक अडीच हजार कोटींचा टप्पा गाठणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर विकासाची दिशा ठरविणाऱ्या आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक अडीच हजार कोटींचा टप्पा गाठणार आहे.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता गृहीत धरून त्यापूर्वीच अंदाजपत्रक मंजुरी करण्यासाठी धावपळ सुरू आहे.

त्याचाच एक भाग म्हणून सुट्टीच्या दिवशीही विभागांची मॅरेथॉन बैठक होणार आहे. (Budget jump crosses two half thousand crores Lok Sabha Election Code of Conduct is already in running for approval NMC News)

एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी आचारसंहिता लागू होणार असल्याने २०२३-२४ चे सुधारित अंदाजपत्रक व २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी पालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे. मागील वर्षी दोन हजार ४७७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते.

यावर्षी अडीच हजार कोटींच्या वर अंदाजपत्रक पोहचेल असा अंदाज आहे. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत कामांची यादी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु नगर नियोजन, मिळकत व बांधकाम विभागाकडून माहिती देण्यास विलंब झाला.

त्यामुळे जानेवारी महिन्यात सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याची वेळ लेखाविभागावर आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मॅरेथॉन बैठका सुरू आहे.

प्रशासनाची धावपळ

एकीकडे बैठका तर दुसरीकडे अंदाजपत्रक सादर करावे लागणार असल्याने व त्यातही लोकसभा निवडणुकीचे आचार संहिता लागू झाल्यास तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने २० फेब्रुवारीच्या आत अंदाजपत्रक मंजूर करण्याची घाई सुरू आहे.

त्या पार्श्वभूमीवर आता शनिवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी देखील महापालिका आयुक्तांनी बैठक बोलावली आहे. खाते प्रमुखांना या बैठकीत पाचारण करण्यात आले असून त्यांच्याकडून खर्चाची आकडेवारी घेऊन मूळ अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे.

तीन हजार कोटींची शक्यता

२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये २ हजार ४७७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे.

यावर्षी कर विभागाने मोठ्या प्रमाणात कर वसुली केल्याने तसेच शासनाकडून प्राप्त होणाऱ्या जीएसटी अनुदानामध्ये आठ ते दहा टक्के वाढ होणार असल्याने अंदाजपत्रकात पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न अधिक वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अडीच हजार कोटी रुपयांच्या वर अंदाजपत्रक पोहचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT