Builders warned to start agitation if steel price hike is not withdrawn  
नाशिक

सिमेंट, स्टीलची दरवाढ मागे घ्या; अन्यथा बांधकाम व्यावसायिक छेडणार आंदोलन

रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक) : सिमेंट व स्टीलच्या दरात तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाल्याने बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. उत्पादकांवर शासनाचा अंकुश नसल्याने सिमेंट व स्टील कंपन्यांनी मनमानी पद्धतीने दरवाढ केली आहे.

या दरवाढीच्या निषेधार्थ पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया मालेगाव सेंटरअंतर्गत सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील सर्व बांधकाम ठेकेदार संघटना व मजूर संघटनांतर्फे शुक्रवारी (ता. १२) कामबंद आंदोलन छेडण्यात आले. शासनाने कंपन्यांवर नियामक प्राधिकरण नियुक्त करून दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

बांधकाम क्षेत्रावर विपरीत परिणाम

सकाळी अकराला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया मालेगाव सेंटरचे अध्यक्ष रवींद्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व बांधकाम ठेकेदार संघटना व मजूर संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना निवेदन दिले. लॉकडाउननंतर बांधकाम साहित्याच्या दरात मोठी भाववाढ झाल्याने बांधकाम क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना घरखरेदी करणे आता परवडत नाही. सरकारी कामे व इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित कामांनाही या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच असंख्य अडचणी असताना दरवाढीमुळे बांधकाम क्षेत्राचे कंबरडेच मोडले आहे, असा आरोप करण्यात आला. राहुल भदाणे, राजेंद्र पवार, डी. एम. पाटील, अजय पाटील, संदीप बागूल, धनश्री ठाकरे, नितीन वाघ, शिवाजी रौंदळ, प्रशांत रौंदळ, दत्तू बैताडे, संजय वाघ, स्वप्नील वीरगावकर, मयूर पाटील, मंगेश खैरनार, दीपक सोनवणे, सुनील सोनवणे, विलास सूर्यवंशी, नीलेश अमृतकार, दीपक आहिरे, संदीप कापडणीस, नाना मोरकर, रमेश भामरे, कुणाल सोनवणे, संदीप कापडणीस, सनी शर्मा, मनीष देवरे, अरुण भामरे, अमित बधान, वसंत मुंडावरे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT