Closed uphagraha at the bus stand here. The thorn bushes in the yard in the second photo. In the third photo, the closed water tank.
Closed uphagraha at the bus stand here. The thorn bushes in the yard in the second photo. In the third photo, the closed water tank. esakal
नाशिक

Nashik News : ताहाराबाद बसस्थानकात सुविधांचा बोजवारा; प्रवाशांची नाराजी

सकाळ वृत्तसेवा

अंतापूर (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद बसस्थानकात सुविधांचा बोजवारा उडाला असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Burden of facilities at Taharabad Bus Stand Displeasure of passengers Nashik Latest Marathi News)

भावी तालुका म्हणून असलेले विंचूर- प्रकाशा राज्यमार्गावरील ताहाराबाद हे पंचक्रोशीतील मोठे गाव आहे. आदिवासी पश्‍चिम भागासह परिसरातील शंभर ते सव्वाशे गावातील प्रवासी, विद्यार्थ्यांचा येथील बसस्थानकाशी संबंध येतो. मांगीतुंगी येथील भारतातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र, साल्हेर, मुल्हेर ऐतिहासिक किल्ले, अंतापूर, मुल्हेर येथील धार्मिक तीर्थक्षेत्र, शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखाना, ताहाराबाद येथे बँक, शाळा, कॉलेज, पतसंस्था, महावितरण, वनविभाग, पोस्ट विभागाचे कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी रुग्णालये, हॉटेल, किराणा, कपडे, इतर व्यावसायिक दुकाने असल्याने प्रतिदिन मोठ्या प्रमाणात नागरिकांचा या गावाशी संबंध येतो.

परंतु, बसस्थानकाची झालेली दुरावस्था वाईट आहे. नादुरुस्त शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, काटेरी झुडपांचे अतिक्रमण, आवार खड्डेमय झाल्याने प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. एसटी उपहारगृह अनेक महिन्यांपासून बंदच आहे. अस्वच्छतेचे प्रमाणही वाढले आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे गावासह परिसरात महामंडळाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

वरिष्ठ विभागाने समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे, संचालक इंजि. संजय भामरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रेखा पवार, ताहाराबाद सोसायटीचे अध्यक्ष के. पी. जाधव, पिंपळकोठेचे माजी सरपंच किशोर भामरे, भडाने येथील माजी सरपंच नानासाहेब भामरे, काँग्रेसचे नेते मिलिंद चित्ते, अरुण नंदन, दीपक कांकरिया, सामाजिक कार्यकर्ते गजानन साळवे, गणेश मोरे, मुन्ना गांगुर्डे, किरण गांगुर्डे, सचिन जाधव यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

"ताहाराबाद बसस्थानकावरून मालेगाव, मनमाड, नाशिक, दोंडाईचा, नंदुरबार, नवापूर, सुरत, अहमदाबाद, पाटण, साक्री, धुळे आगाराच्या प्रवासी गाड्या येतात. त्यामुळे स्थानकात स्थानिक व परिसरातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेकवेळा लांब पल्ल्याच्या गाड्या स्थानकात न येता बाहेरून निघून जात असल्याने तीही गैरसोय होते."

- शोभा कांकरीया, ग्रामपंचायत सदस्या, ताहाराबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT