robbery esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरात घरफोड्यांचे सत्र; लाखोंचा ऐवज लंपास!

नरेश हाळणोर

नाशिक : शहरातील गंगापूर रोडवरील सागर स्वीटचे ऑफिसचे लॉक तोडून १५ लाखांची रोकडसह, सातपूर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प या परिसरात चोरट्यांनी घरफोड्या करीत १७ लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तर, द्वारका सर्कल येथे पुण्याहून आलेल्या महिलेची पर्स चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घरफोडीच्या या घटनांनी शहर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचा फोलपणा पुन्हा उघड झाला आहे. (Burglary session in city Nashik Nashik Crime News)

रतन पुनाजी चौधरी (रा. नयनतारा एम्पायर, लवाटे नगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल येथे सागर स्विट्स हे दुकान आहे. गेल्या रविवारी (ता. १८) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानातील मोकळ्या गॅलरीतून जाऊन ऑफिसच्या दरवाजाचे लॉक तोडले आणि ऑफिसातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली १५ लाखांची रोकड चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक सूर्यवंशी हे तपास करीत आहेत. दुसरी घरफोडीची घटना सोमेश्वर कॉलनीत घडली. सुनील बाबुराव निगळ (रा. निगळ मळा, सोमेश्वर कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याने निगळ मळयातील त्यांच्या बंद घराचे गेल्या शनिवारी (ता. १७) कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १५ हजार रुपयांचा टीव्ही असा ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली.

याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक उबाळे हे तपास करीत आहेत. घरफोडीची तिसरी घटना नाशिकरोडच्या गोरेवाडीत घडली. अनिल महेंद्र शुक्ला (रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या ७ ते १५ डिसेंबरदरम्यान सहकुटूंब विवाह सोहळ्यानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधून बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

चोरट्यांनी घरातील टीव्ही, चांदीचे शिक्के, चार हजार रुपयांची रोकड असा ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक गोसावी हे तपास करीत आहेत. तर चौथी घरफोडी देवळाली कॅम्पला झाली. गीता उज्वल सिंग (रा. नवी मुंबई) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने २१ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत देवळाली कॅम्प येथील बनाचाळ परिसरातील सिंग यांच्या बंद घराचे लॉक तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याने घरातील ५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १२ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एक लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक एस.एस. पाडवी हे करीत आहेत.

महिलेची पर्स चोरीला

हर्षदा नितीन गवांदे (रा. एसएसडी हाईटस्‌, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या रविवारी (ता. १८) सकाळी सहा वाजेच्या सुमारास पुण्याहून नाशिकच्या द्वारका सर्कल येथील कराड बंधू चिवडा या दुकानासमोर उतरल्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लंपास केली. या पर्समध्ये १ लाख २० हजारांची सोन्याची पोत व १२ हजार रुपयांचा मोबाईल असा १ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT