Nashik: After the house burglary was solved, the cash seized from the suspects and the two suspects along with the police officers and staff esakal
नाशिक

Nashik News : अवघ्या 12 तासात पोलिसांकडून घरफोडीची उकल

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून १२ तासात नानावली येथील घरफोडीची उकल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५५ हजार ५०० चा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

नानावली येथील राजेंद्र माळी यांच्या घरी चोरी झाली होती. पोलिस संशयितांचा शोध घेत होते. गुन्हे शोध पथकाचे सागर निकुंभ आणि धनंजय हासे यांना घरफोडीतील संशयित नानावली येथील असल्याची माहिती मिळाली. (Burglary solved by police in just 12 hours Nashik News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक किशोर खांडवी, रमेश कोळी, सागर निकुंभ, धनंजय हासे, लक्ष्मण ठेपणे, श्यामकांत पाटील, एम. व्ही. बोरसे यांनी नानावली येथून संशयित इरफान ऊर्फ पाथऱ्या शेरु सय्यद (२४) याला बुधवारी रात्री ताब्यात घेतले.

त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच संशयित सनी सोमनाथ दोडके (२०, रा.काझी गढी) हादेखील चोरीत सहभागी असल्याचे सांगितले. अधिक चौकशीत काही दिवसांपूर्वी कुंभारवाडा येथे झालेली चोरीदेखील त्यांनी दोघांनी मिळून केल्याचे सांगितले.

शिवाय चोरीचा ऐवज विक्री केल्याचे सांगितले. नानावली येथे झालेली घरफोडीतील ५५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे दोघांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Climate Impact: मुंबईकरांनो सावधान! शहर नष्ट होण्याच्या मार्गावर, गेल्यावर्षीचा रिपोर्ट अजून गांभिर्याने घेतला नाही तर...

Pune Fraud Case : कोट्यवधींची फसवणूक करून मालमत्ता खरेदी; कोथरूडच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्याच्या फसवणूकदारांना येरवडा जेल

Shirdi Highway:'शिर्डी महामार्ग होणार गुळगुळीत अन् ठणठणीत'; डांबराचा पहिला थर पडला, वर्षभरात पालटणार रूपडे !

Pune Weather Update : पुणेकरांनो, थंडी आणखी वाढणार! 'या' तारखेपासून पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता

Margshirsha Purnima 2025: 'या' 5 राशी माता लक्ष्मीला आहेत खूप प्रिय, मार्गशीर्ष पौर्णिमेपासून सुरु होईल गोल्डन टाइम

SCROLL FOR NEXT