Burnt Bus esakal
नाशिक

Nashik Bus Fire Accident : अचानक आग लागली अन् क्षणात संपूर्ण बस जळून खाक...

संजीव निकम

Nashik Bus Fire Accident : नांदगाव/साकोरा ता २४ येथील बस स्थानकात उभ्या असलेल्या बसला अचानक आग लागली. बस आगीत संपूर्ण जळून खाक झाल्याने तिचा केवळ सांगाडा उरला होता. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. (bus standing at bus station at Nandgaon Sakora suddenly caught fire burned bus nashik fire accident news)

एसटीबसला लागलेल्या आगीनंतर स्थानकातील नियंत्रण कक्षाने मनमाड येथील अग्निशमन दलाला फोन केला मात्र अग्निशमन दलाची गाडी येण्यापूर्वीच तोवर  बसचा कोळसा झालेला होता. बसमधील बॅटरी व शॉर्टसर्किटने वायरिंग पेटल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मानव विकास अंतर्गत मिळालेल्या या बसचा विद्यार्थी ने आण करण्यासाठी वापर केला जातो. आज शनिवार असल्याने शाळा दुपारीच सुटल्याने या बसला चाळीसगावला पाठविण्यात आले होते. नांदगाव स्थानकात प्रवाशी उतरून गेल्याने मोठा अनर्थ टळला.

मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली बस केवळ सांगाड्यापुरती उरली. सांयकाळी साडे पाच वाजता चाळीसगावहून निघालेली बस ( क्रमांकMH-07 C-9337 ) स्थानकात चालक ज्ञानेश्वर थोरे यांनी नांदगाव स्थानकात सांयकाळी साडे सहाला आणली.

त्यातील सात-आठ प्रवाशी उतरले बस आल्याचा रिपोर्ट करण्यासाठी चालक थोरे सहकारी वाहक अरविंद ताडगे यांच्या सोबत नियंत्रण कक्षाकडे जात असतांना त्यांची पाठ वळत नाही तोच त्यांनी उभ्या केलेल्या बसमधून धुरासह आगीच्या ज्वाला निघू लागल्या होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अचानक लागलेल्या आगीच्या या प्रकारामुळे स्थानकातील अन्य वाहक चालक यांच्यासह उपस्थितीत प्रवासी वर्गही चक्रावून गेला. स्थानकात एरवी ज्या ठिकाणी बस लागतात. त्या ठिकाणी आणलेली बस उभी न करता चालकाने ती दूर उभी केली स्थानकातील नियंत्रण कक्षात बस आणल्याचा रिपोर्ट करून ते डेपोत या बसला घेऊन जाणार होते.

मात्र त्या दरम्यान या बसला आग लागली. आगारातून सात ते आठ लहान अग्निशमन यंत्रे आणून लागलेलीच आग विझविण्याचा पर्यटन देखील अपुरा ठरला. याच दरम्यान टँकर आणून आग विझविली जात होती.

अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली खरी मात्र संपूर्ण बसची तोवर राखरांगोळी झाली होती.  बसला लागलेली आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु झाले. आगारातल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांसह वाहक चालक वर्गाने हातात मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

आग लागली म्हणून आगारप्रमुख विश्वास गावित यांनी नांदगाव मनमाड पालिकेत अग्निशमन दलाला फोन केला. मनमाड येथील अग्निशमन दलाचे वाहन दीड तास उशिरा घटनस्थळी आले, तर नांदगाव पालिकेकडे अग्निशमन व्यवस्था नसल्याची कमतरता यावेळी जाणवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT