businessman shot himself in the car and committed suicide Nashik Marathi News
businessman shot himself in the car and committed suicide Nashik Marathi News 
नाशिक

कारमध्येच झाडल्या स्वत:वर बंदुकीच्या गोळ्या; उद्योजकाच्या आत्महत्येने खळबळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक : 'माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून, मी सटाणाजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा आहे," असे त्यांनी मावसभावाला मोबाईलवर संपर्क साधत सांगितले. आणि दुसऱ्याच क्षणी खळबळजनक बातमी आली. वाचा सविस्तर..

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदलाल शिंदे हे मुळचे धु्ळ्याचे उद्योजक एमएच 15 - एफटी- 0133  क्रमांकाच्या स्कोडा कारने कारसामोडे येथून नाशिककडे निघाले होते. ते ताहाराबाद रोडवरील यशवंतनगरजवळ आल्यानंतर त्यांचे मावसभावाशी फोनवर बोलणे झाले. 'माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून, मी सटाणाजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा आहे', असे त्यांनी मावसभावाल सांगितले. हे ऐकल्यानंतर शिंदे यांचा मावसभाऊ व इतर दोघे नातेवाईक घटनास्थळी लगेच पोहचले, मात्र तेव्हा शिंदे हे आपल्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.

उद्योजक नाशिक मनसेचे नेते

सटाणा शहराच्या जवळ यशवंनगर येथील जोगेश्वरी फर्टिलायझर्स या दुकानासमोरील हायवेवर आज (दि.७) दुपारी एका उद्योजकाने कारमध्येच रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने समोर आले आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे पुर्ण नाव नंदलाल गणपत शिंदे (वय ५५, रा.सामोडे, ता.साक्री, जि.धुळे, सध्या रा. सिडको, नाशिक) असे असून ते कामटवाडा, नाशिक येथील मनसेचे नेते व महिंद्रा अँड महिंद्रामधील युनियनचे माजी पदाधिकारी होते असे  समोर आले आहे

पोलिसांचा तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार नवनाथ पवार, विजय वाघ, बैरागी यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रथम रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली. पोलिसांनी घटनास्थळी रुग्णवाहिकेला बोलवून शिंदे यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात प. पुढील तपास सटाणा पोलिसांनी सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT