Crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : सोन्याची नाणी विकत घेणे पडले महागात; दोघांना बसला 10 लाखाचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

सुरगाणा : जमीन खोदताना सापडलेली सोन्याची नाणी विकायची असल्याचे सांगून दोन व्यक्तीस दहा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना सुरगाण्यात घडली आहे. याबाबत दादरा नगर हवेली जिल्ह्यातील सेलवास येथील मुकेश खोंडे (वय २६) यांनी सुरगाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. तसेच या प्रकरणात एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे.

सेलवास येथील मुकेश खोंडे यांना खोदकामात सोन्याची नाणी विकणार असल्याचे समजताच त्यांनी ही नाणे घेण्याचे ठरवीत संबंधितासोबत संपर्क साधला व त्यानंतर एक ठिकाण ठरविले. तत्पूर्वी यावेळी पाच हजार रुपये इसार देऊन सौदा ठरला व उर्वरित रक्कम दुसऱ्या फेरीत पैसे व सोन्याची नाणी देवाण- घेण्याबाबत बोलणे झाले. ठरल्यानुसार २९ नोव्हेंबर २०२२ ला सुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोन्याच्या नाण्यांचा खरेदी-विक्री होणार होती. ठरल्याप्रमाणे सेलवास येथील मुकेश खोंडे, नारायण गुज्जर व इतर जोडीदार १० लाख रुपये घेऊन ठरल्यावेळी संध्याकाळी सहाला सुळे रस्त्यालगत मोहाच्या झाडाजवळ पोहोचले.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

विक्रीदार व खोंडे यांच्यात बोलणी सुरु असतानाच एका चारचाकीतून (एमएच ०५ एबी ६८५५) सुरगाणा तालुक्यातील कमलाकर गांगुर्डे (रा. वडपाडा) आणि रमेश पवार (रा. मोकपाडा) सुरेश कनसे (रा.भोकरपाडा), कांतीलाल पवार हे आले व आम्ही पोलीस असल्याचे सांगत पिस्तुलाचा धाक दाखवून व मारण्याची धमकी देऊन मुकेश खोंडे व नारायण गुज्जर यांचेकडील १० लाख रुपये बळजबरीने काढून पळ काढला.

यानंतर खोंडे यांनी सुरगाणा पोलिस ठाणे गाठत घडलेला सर्व प्रकार सांगितले. त्यानंतर सुरगाणा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे घटनेचे गांर्भीय लक्षात घेत तपास करत संशयित रमेश पवार व कमलाकर गांगुर्डे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. करून रमेश देवाजी पवार व कमलाकर सुरेश गांगुर्डे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. दोघा संशयित यांना दिंडोरी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT