farmer cabbage.jpg 
नाशिक

का आली शेतकऱ्यावर दुर्दैवी वेळ..? हताश होत केले असे काही...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ दिक्षी : शेतकऱ्यावर सध्या अनेक संकटे येत असल्याने त्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यातून देखील तो कष्टाचे पाणी करून पीक पिकवित आहे. मात्र अखेर त्याच्या सोन्यासारख्या पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हताश होत आहे. ​

सोन्यासारख्या पिकाला कवडीमोल भाव

तब्बल साठ दिवस खत, पाणी, औषध फवारणी केल्यानंतर विकण्याची वेळ आली असता अवघा कवडीमोल भाव मिळाल्याने दिक्षी येथील शेतकऱ्यावर पिकविलेला कोबी आणि फ्लॉवर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. निफाड तालुक्‍यातील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे परिसरात मोठ्या प्रमाणात कोबीची लागवड होते. ती ओझर व नाशिक येथील बाजार समितीत विक्रीला नेली जाते. परंतु कोबीचा मोठा कंद (सुमारे दोन किलो वजनाचा) सरासरी तीन रुपये प्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे तो शेतातून बाजारपेठेत आणण्यासही परवडत नसल्याचे उत्पादक सांगतात. कांदा व मका खाली झाल्यावर मुबलक पाणी असल्याने कोबी, फ्लॉवर पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली. मध्यंतरी कांद्याला भाव असल्याने पर्याय म्हणून कोबीला मोठी मागणी होती. त्यामुळे पुढेही कोबीला भाव राहील, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कोबी पिकाची लागवड केली.

शेतकरी आर्थिक अडचणीत

मात्र कोरोनामुळे लॉकडाउन सुरू असल्याने हॉटेल व्यवसाय, चायनिज विकणारे छोटे-मोठे हॉटेल व लग्नसमारंभ बंद आहेत. त्यामुळे भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेले कोबीचे भाव घसरले आहेत. बाजार समितीत कमी दर आहेत, तर आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला कोबी अक्षरशः फेकून द्यावा लागत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. 

एकंदरीत एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च

कोबी हे पीक घेणेसुद्धा खर्चिक झालेले आहे. मोठ्या प्रमाणात व महागडी औषधे फवारणी, लागवड, मजुरी असा एकंदरीत एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. उत्पादन खर्चाचा विचार करता कोबीचा गड्डा दहा ते 15 रुपयाला विकला गेला पाहिजे. म्हणजे शेकऱ्याला परवडेल. - नामदेव चौधरी, फ्लॉवर उत्पादक शेतकरी, दिक्षी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

SCROLL FOR NEXT